esakal | लिंबाळवाडी खून प्रकरणी, सहा जणांवर गुन्हा दाखल 
sakal

बोलून बातमी शोधा

crime.jpg

लिंबाळवाडी (ता.चाकुर) येथील एका व्यक्तीचा शेतीच्या वादावरून खून झाल्याप्रकरणी सहा जणांवर शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशनमध्ये खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

लिंबाळवाडी खून प्रकरणी, सहा जणांवर गुन्हा दाखल 

sakal_logo
By
अशोक बिराजदार

नळेगाव (लातूर) : लिंबाळवाडी (ता.चाकुर) येथील एका व्यक्तीचा शेतीच्या वादावरून खून झाल्याप्रकरणी सहा जणांवर शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशनमध्ये खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून, चाकूर तालुक्यातील लिंबाळवाडी येथील रावसाहेब गुंडाजी गजिले यांनी वीस ते पंचवीस वर्षापूर्वी हुसेन नबी शेख (रा.शिवपुर, ता. शिरूर अनंतपाळ) यांचेकडून अडीच एकर शेती खरेदीचा व्यवहार केला होता. व्यवहार केल्याप्रमाणे अडीच एकर शेतीपैकी दीड एकर शेती हुसेन शेख यांची बहीण हिरा शेख यांच्या नावावर होती. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आम्हाला ठराव केल्याप्रमाणे जमीन न देता शिवपुर येथील भास्कर कुंभार यास विक्री केली आहे. आमच्या नावावरील शेती पण त्याचीच आहे म्हणून तो नेहमी वाद घालत होता. सदर जमिनीवर आम्ही पेरणी केली होती. गुरुवारी (ता.एक ) आमच्या शेतातील सोयाबीन काढत असताना सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास भास्कर कुंभार, सुभाष कुंभार, दत्ता कुंभार, सोन्या कुंभार, सुभाष कुंभार यांची पत्नी, भास्कर कुंभार यांची पत्नी शेतीत आले. शेतातील सोयाबीन काढायचे नाही. म्हणून सुभाष कुंभार, दत्ता कुंभार यांनी रावसाहेब गजिले यांच्या छातीत बुक्क्या मारून जोरात खाली जमिनीवर ढकलून दिले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अखेर कमलबाई रावसाहेब गजिले यांच्या फिर्यादीवरून शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशन मध्ये सहा जणांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)