esakal | दीडशेची क्वार्टर पाचशेला, तर दीड हजाराचे युनिट चार हजारांना... 
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad News

दीडशेची क्वार्टर पाचशे रुपयांना... तर दीड हजाराचे युनिट चार हजारांपर्यंत पोहचले आहे... एवढा भाव असला, तरी मद्यपींनी दारुचा नाद काही सोडल्याचे दिसत नाही. प्रशासनाने सर्व बियर बार व वाईन शॉप सील केले असतानाही दारु बाहेर येतेच कशी, असा प्रश्न विचारला जात आहे. अधिकच्या भावाने दारु विकत घ्यावी लागत असल्याने मद्यपींचे आर्थिक गणित देखील कोलमडल्याचे दिसून येत आहे.

दीडशेची क्वार्टर पाचशेला, तर दीड हजाराचे युनिट चार हजारांना... 

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : दीडशेची क्वार्टर पाचशे रुपयांना... तर दीड हजाराचे युनिट चार हजारांपर्यंत पोहचले आहे... एवढा भाव असला, तरी मद्यपींनी दारुचा नाद काही सोडल्याचे दिसत नाही. प्रशासनाने सर्व बियर बार व वाईन शॉप सील केले असतानाही दारु बाहेर येतेच कशी, असा प्रश्न विचारला जात आहे. अधिकच्या भावाने दारु विकत घ्यावी लागत असल्याने मद्यपींचे आर्थिक गणित देखील कोलमडल्याचे दिसून येत आहे.

राज्यामध्ये लॉकडाऊन झाले, त्याच दिवशी रात्रीपर्यंत बियर बार व वाईन शॉप सुरू राहिले. त्यावेळी ज्यांनी स्टॉक केला त्यांचे काही दिवस शौक करण्यात निवांत गेले. पहिल्यांदा राज्याने लॉकडाऊन जाहीर केले. त्यानंतर केंद्राने ते अधिक दिवस वाढविले. त्यामुळे सगळ्यांचे गणित बिघडले. पण त्यातही काही जणांनी मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री करण्यास सुरुवात केली होती. अशा आठ बियरबार चालकांचा परवाना कायमचा रद्द कऱण्यात आल्याने त्यावर काही प्रमाणात अंकुश आला होता. पण पुन्हा दारु विक्री तेजीत सुरु झाली आहे. 

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

आता दीडशे रुपयांना मिळणारी क्वार्टर चक्क पाचशे रुपयांना मिळत आहे. त्यातही क्वार्टर ओरिजनल आहे की बनावट याचा भरवसा नाही. तरीही मद्यपी मोठ्या प्रमाणात दारु घेताना दिसत आहेत. वाईन शॉपला साधारण काळात दीड हजार रुपयांना चार क्वार्टरचे युनिट आता चार हजारांवर गेल्याचे दिसून येत आहे. 

क्रिकेटपूर्वी सचिनने केलेय या चित्रपटात काम

साधारण तीनशे रुपयाची ही क्वार्टर साडेसातशे ते एक हजार रुपयांना मिळत आहे. त्यातही उच्च प्रतीच्या दारुच्या किंमती अजूनही मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत, बाराशे ते दीड हजार रुपयांना या क्वार्टर विकल्या जात आहेत. राज ठाकरे यांनी महसूल वाढीसाठी वाईन शॉप सुरु करण्याची मागणी केल्याने आता लूट होणार नाही या कल्पनेने तळीराम सुखावले असले, तरी दारूचा काळा बाजार करणाऱ्यांना यामुळे धंदा चौपट होण्याची भीतीही लागून राहिली आहे.