esakal | लॉकडाऊनचे उल्लंघन- नांदेड परिक्षेत्रात सात हजार ८०० गुन्हे 

बोलून बातमी शोधा

फोटो

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महनिरीक्षक मनोज लोहिया यांनी लॉकडाऊनचे उल्लघंन करणाऱ्या नांदेड परिक्षेत्रात आजपर्यंत (ता. १३) सात हजार ८०० गुन्हे दाखल करण्यात आल्याचे ‘सकाळ’शी बोलतांना सांगितले

लॉकडाऊनचे उल्लंघन- नांदेड परिक्षेत्रात सात हजार ८०० गुन्हे 
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना या वैश्‍विक महामारीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पोलिस, जिल्हा प्रशासनासह सर्वच नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजे. लॉकडाऊनचे उल्लंघन न करता कामाशिवाय घरातून बाहेर पडणे म्हणजे गंभीर समस्येला तोंड देण्यासारखे आहे. सर्वांनी एकजूट होऊन या महामारीवर नियंत्रण मिळवायचे आहे. तसेच नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महनिरीक्षक मनोज लोहिया यांनी लॉकडाऊनचे उल्लघंन करणाऱ्या नांदेड परिक्षेत्रात आजपर्यंत (ता. १३) सात हजार ८०० गुन्हे दाखल करण्यात आल्याचे ‘सकाळ’शी बोलतांना सांगितले. 

संपूर्ण जगात कोरोना या विषाणूने आपले हातपाय पसरून हाहाकार माजविला आहे. महासत्ता असलेले देश या आजारापूढे हतबल झाले आहेत. ही परिस्थिती सध्या आपल्याकडे जरी नसली तरी प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्‍यक आहे. अत्यावश्‍यक काम असले तरच घराबेहर पडा अन्यथा बाहेर पडू नका. पोलिस आपल्यासाठी अहोरात्र रस्त्यावर उभे राहून कळकळीने आपणास सांगत आहेत. ही लढाई एकट्या पोलिस किंवा प्रशासनाची नाही. ती आपणा सर्वांची असल्याने प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन जर आपण घरी थांबलो तर नक्कीच ही लढाई जिंकु असा विश्‍स श्री. लोहिया यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा - Video : सामना भीतीचा, डॉ. मुलमुले यांचे अनुभवकथन त्यांच्याच शब्दात

पोलिसांचा रोष पत्करुन घेऊ नका

महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तीने दिवसभर बाहेर राहिल्यानंतर घरी जाताच आपले कपडे व हातपाय धूवूनच घरात प्रवेश केल्यानंतर स्नान करणे आवश्‍यक आहे. जर कुठली वस्तु घरात आणली तर तिलाही सॅनीटायझर करा. पोलिस व महसुल प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करा तसेच घराबाहेर पडून पोलिसांचा रोष पत्करुन घेऊ नका. 

सात हजार ८०० गुन्ह्यांची नोंद

प्रशासानाकडून दिलेल्या सुचनांचे पालन न करता लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नांदेड परिक्षेत्रांतर्गत ता. २२ मार्च ते ता. १३ एप्रील या काळात जवळपास कलम १८८ अन्वये सात हजार ८०० गुन्हे दाखल करण्यात आले असून एक हजाराहून अधिक जणांना याचा फटका बसला आहे. यात नांदेड जिल्ह्यात ६८७, लातूरमध्ये ६ हजार ७५०, परभणी जिल्ह्यात १६० आणि हिंगोलीमध्ये २८५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. विशेष करून अशा गुन्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनी अडकू नये असे आवाहन परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी केले आहे.