esakal | बहुरुपी समाजातील ४० कुटुंब लॉकडाऊन 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

भिक्षूकीवर जगणा-या नारवट येथील आदिवासी, बहुरूपी २७० लोकांचे कोरोना महामारी व उपासमारीच्या लढ्यात उपाशी पोटही झाले आहे लॉकडाऊन

बहुरुपी समाजातील ४० कुटुंब लॉकडाऊन 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : पोलिसाच्या गणवेशात विनोदातून धाक दाखवत तर कधी पारंपारीक गीत गात भिक्षा मागणारा बहुरुपी समाज या लॉकडाऊनमुळे त्रस्त झाला आहे. नारवट (ता. भोकर) येथील बहुरुपी समाजातील ४० कुटुंबातील २७० नागरीकांनी शासनाच्या आदेशांचे पालन करत स्वत: सह आपले उपाशी पोटही लॉकडाऊन केले आहे. परंतू आपल्या कलेतून इतरांच्या चेह-यावर हसू व आनंद पाहणारे हे लोक या बिकट परिस्थितीतही कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लग्न सोहळा व जत्रेत कोणीही जायचं नाही (गर्दीत) आता भिक्षा मागायची नाही असे सांगत आहेत. 

कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोरोना प्रादुर्भाव संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या नियमांची अंमलबजावणी करत उपरोक्त महत्वपुर्ण हा संदेश ते देत आहेत. भोकर शहरातील सर्व निर्वासित व हातावर पोट असलेल्यांची भुक भागविण्याचे महत्कार्य अनेक स्वयंसेवींतून होत आहे. परंतू ग्रामीण भागातील हा पारंपारीक कलावंत आजही उपाशी असल्याने यांच्या तोंडीही दोन घास दानशूरांनी भरवावेत अशी अपेक्षा या भुकेल्यांतून होत आहे.

महापुरुषांचे जीवन गौरव गीते गाऊन अनेकांना आनंद

पोलीस वेश परिधान करुन व त्यांच्या भाषेत बोलून मनोरंजनाने इतरांच्या चेह-यावर हसू आणणारे व भावगीते, भक्तीगीते, महापुरुषांचे जीवन गौरव गीते गाऊन अनेकांना आनंद प्राप्त करुन देणारे हे बहुरुपी समाजबांधव दात्यांकडून मिळेल ती भिक्षा घेऊन आपल्या कुटूंबीयांची उपजीविका भागवितात. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडात या समाजाचा हेर म्हणून सदोपयोग झाला. तेव्हापासून आजपर्यंत ही या समाजातील अनेक लोकांनी आपली पारंपारीक कला जोपासून ठेवलेली आहे. 

हेही वाचालॉकडाऊन : पदवी, पदव्युत्तर परीक्षेचे काय? विद्यार्थ्यांमध्ये चिंता

भिक्षेत जगण्या शिवाय यांच्यापुढे अन्य पर्याय 

अशाच पारंपारीक कलावंत असलेल्या बहुरुपी समाजाच्या ४० कुटूंबातील २७० लोकांची वस्ती नारवट येथे आहे. उत्कृष्ठ कला यांच्या अंगी असली तरी यांना मोलमजूरीचे काम कोणीही देत नाही. त्यामुळे या कलेच्या बळावरच मिळेल त्या भिक्षेत जगण्या शिवाय यांच्यापुढे अन्य पर्याय नाही. कोरोना संसर्ग बाधेच्या विळख्यात देश व आपले राज्य ही अडकले आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांतर्गत देश होम लॉकडाऊन केला आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती कायदा व संचारबंदी कायदा लागू केला आहे.

घराबाहेर पडून भिक्षा मागणे ही नाही

यामुळे सर्व भारतीय या आदेशाचे पालन करत असून होम लॉकडाऊन झाले आहेत. याच अनुशंगाने शासनाने दिलेल्या सर्व सुचना व आदेशाचे पालन करुन नारवट (ता.भोकर) येथील पारंपारीक कलावंत असलेले बहुरुपी कुटूंबीय ही होम लॉकडाऊन झाले आहेत. घराबाहेर पडून भिक्षा मागणे ही नाही व गावात हाताला कामही नाही. त्यामुळे आपल्या कलेवर पोट असलेल्या या भिक्षूक कलावंतांचे उपाशी पोट ही लॉकडाऊन झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

लॉकडाऊन होऊन ते कोरोनाशी लढत आहेत

भले ही हे लोक अर्धपोटी उपजीविका करत असले तरी अशा बिकट परिस्थितीतही होम लॉकडाऊन होऊन ते कोरोनाशी लढत आहेत. तसेच शासनाचे आदेश पाळलेच पाहिजेत, घरी राहिलं पाहिजे, गर्दीच्या ठिकाणी गेलं नाही पाहिजे, अनावश्यक प्रवास केला नाही पाहिजे, हात धुण्यापासून स्वच्छतेचे सर्व नियम पाळले पाहिजेत, शासन प्रशासनास सहकार्य केले पाहिजे असा मौलीक संदेश ही ते देत आहेत. आणि गीत गाऊन म्हणत आहेत ...

येथे क्लिक करा कोवीड-19 : वंचितकडून मोफत रुग्णवाहिका लोकार्पण

शासनाच्या पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य

हे संदेशात्मक गीत दादाराव झांब्रुजी गीरे गात असून Social Distancing चे नियम पाळून गणेश गीरे, विलास साखरे, सुभाष साखरे, विनायक चौपार, गजानन साखरे हे त्यांना संगीत साथ देत आहेत.या कलावंतांना व त्यांच्या कलेला दाद दिलीच पाहिजे.परंतू केवळ दाद दिल्याने त्यांच्या पोटाची भुक भागणार नाही ? हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. शासनाच्या पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य त्यांना लवकरच मिळणार आहे. परंतू संसार म्हटलं की जगण्यासाठी याशिवाय बरच काही लागते ? हे सर्वांनाच माहित आहे. 

मदतीसाठी दानशूरांचे हात पुढे सरसावले 

भोकर शहरातील भटके, विमुक्त,राज्य व परप्रांतीय निर्वासित अशा आदी हातावर पोट असलेल्यांची भुक भागविण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, स्वसंसेवी लोक, व्यापारी, अधिकारी, प्रतिष्ठीत नागरीक, पत्रकार आदींचे हात पुढे सरसावल्याचे पहावयास मिळत आहे. परंतू नांदेड जिल्ह्यातील पारंपारीक बहुरुपी कलावंताचे एकमेव गाव म्हणून ओळख असलेल्या नारवट या गावाकडे... एकूणच या कलावंताच्या वसतीकडे मदतीसाठी अद्यापही कोणाचेही पाय लागल्याचे पहावयास मिळाले नाही.म्हणून ग्रामीण भागातील या पारंपारीक कलावंतांच्या मदतीसाठी दानशूरांचे हात पुढे सरसावले पाहिजेत.तरच यांची भुक भागेल ? अशी अपेक्षा नामदेव चौपारे,विलास साखरे,गजानन साखरे,दादाराव गीरे,मारोती साखरे यांसह आदी बहुरुपी समाज बांधवांतून व्यक्त होत आहे.