लिंगायत आरक्षणासाठीच्या लातूर बंदला अल्प प्रतिसाद

हरी तुगावकर
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

लातूर - राज्यातील लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी लिंगायत आरक्षण कृती समितीच्या वतीने शुक्रवारी  (ता. २४) लातूर जिल्हा बंदचे आयोजन करण्यात आले आहे. या बंदला शहरात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. या समितीच्या वतीने गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात
आले.

लिंगायत समाजाला आरक्षण लागू करावे, हिंदू लिंगायत नावाने टीसीवर जातीची नोंद असणाऱयास वाणी नावाला असलेले ओबीसीचे आरक्षण मिळण्यासाठी शासनाने शुद्धीपत्रक काढावे या मागणीसाठी बंदचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील गंजगोलाई ते गांधी चौक या रस्त्यावर या समितीचे कार्यकर्ते बंदचे आवाहन करीत फिरले. या बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरु होते. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी गांधी चौकात धरणे आंदोलन केले.

या आंदोलनात समितीचे प्रा. सुदर्शन बिरादार, प्रभाकर पुजारी, काशीनाथ
मोरखंडे, माणिकप्पा कोकणे, मनोज पोतदार, प्रभाकर धमगुंडे, सुभाष मुक्ता,
जी. जी. ब्रह्मवाले, सिद्रामप्पा पोपडे आदींनी पुढाकार घेतला.

Web Title: Low response to Latur Bandh for Lingayat reservation