
Beed Crime: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळं बीड बराच काळापासून चर्चेत आहे. त्यात आता आणखीनं नवा मारहाणीचा प्रकार इथं घडला आहे. लाऊड स्पीकरमुळं आपल्याला त्रास होत असल्याची तक्रार एका वकील महिलेनं केल्यानं तिला गावातील सरपंचासह १० पुरुष मंडळींनी लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली आहे.
यामध्ये या महिलेचं शरीर काळं-निळं पडल्याचे फोटो समोर आले आहेत. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील भाष्य केलं आहे. मारहाण करणारा सरपंच कोण आहे? त्याची एवढी हिंमत कशी वाढली? असा सवालही त्यांनी केला आहे.