
बीड : आपल्या लेडरपॅडरचा गैरवापर करून, ‘एआय’च्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) माध्यमातून आपला आवाज काढून तीन कोटी २० लाख रुपयांचा निधी रत्नागिरीवरून बीडला वर्ग करण्याचे सांगितल्याचा खुलासा विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी केला. त्यानंतर या प्रकाराच्या तपासासाठी मुंबईचे पोलिस गुरुवारी (ता. तीन) बीडमध्ये दाखल झाले.