परभणी - भारतीय रिझर्व्ह बँकेने आज देशातील परकीय गुंतवणुकीची राज्यनिहाय आकडेवारी जाहीर केली असून, त्यानुसार महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी पोहोचला आहे. एकट्या महाराष्ट्रात एकूण गुंतवणुकीच्या तब्बल ४० टक्के परकीय गुंतवणूक झाली असून, ही आकडेवारी राज्यासाठी अभिमानास्पद आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता.२९) परभणीत जाहीर केले.