पैठण (औरंगाबाद) : शिवसेनेच्या भुमरेंनी किती मते मिळवली? | Election Results 2019

छायाचित्र
छायाचित्र

औरंगाबाद ः पैठण विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार संदीपान भूमरे यांनी शिवसेनेचा गड कायम राखला आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे दत्ता गोरडे यांनी त्यांना कडवी झूंज दिली. मात्र, सुरवातीपासून भूमरे यांना मिळालेली आघाडी कायम राहिली.

धनंजय मुंडे काय म्हणाले - क्लिक करा

23 फेऱ्यानंतर भूमरे यांनी 14 हजार 260 मतांची आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. पैठण विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 11 हजार 280 मतदान झाले होते. त्यामध्ये शिवसेनेला 83 हजार 403 मते ; तर दत्ता गोर्डे यांना 69 हजार 264 मते मिळाली. संदीपान भूमरे यांनी 14 हजार 139 हजार मतांची आघाडी घेत विजय निश्‍चित केला. 

नांदेडात काय झाले - क्लिक करा

पैठण विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा मजबुत गड म्हणून ओळखला जातो. शिवसेनेचे विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांनी या मतदारसंघातू चारवेळा विजय मिळवला आहे. 95 ते 2004 अशी हॅट्रीक साधत भुमरे यांनी आपले नाणे खणखणीत असल्याचे सिध्द केले आहे. 2009 मध्ये मात्र त्यांना राष्ट्रवादीकडून धक्कादायक पराभव पचवावा लागला होता. पण पुढच्याच निवडणुकीत त्यांनी युती नसतांना पैठण मतदारसंघ शिवसेनेकडे खेचून आणला. या विधानसभा निवडणुकीत पाचव्यांदा भुमरे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे. विशेष म्हणजे त्यांना पक्षातंर्गत स्पर्धकच नसल्यामुळे भुमरे याचा मार्ग मोकळा होता. 

पैठण विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर संदीपान भुमरे यांच्या शिवाय अन्य पर्याय पक्षापुढे नव्हता. त्यामुळे भुमरे यांना उमेदवारी मिळण्यात कुठलीच अडचण पक्षाला नव्हती. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले होते. जालना लोकसभा मतदारसंघात पैठण विधानसभा येत असल्याने सध्याचे केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी डझनभर इच्छूक पक्षात तयार केले होते. याचा फायदा दानवे यांना लोकसभा निवडणुकीत भरघोत मतदानाच्या रुपात झाला होता.

तालुक्‍यातील शरद सहकारी कारखाना ताब्यात घेत भुमरे यांनी सहकार क्षेत्रात देखील उडी घेतल्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांचे गळीत हंगाम कार्यक्रमाच्या वेळी तोंडभरून कौतुक केले होते. एकंदरित विधानसभेची पाचव्यांदा उमेदवारी मिळवत भुमरे विक्रमाला गवसणी घातली आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com