esakal | माजलगाव नगरपरिषदेचा नुतन नगराध्यक्ष जनविकासचा की राष्ट्रवादीचा?
sakal

बोलून बातमी शोधा

Majalgaon parishad...jpg

नऊ नोव्हेंबरला होणार शिक्कामोर्तब, जगतापांची भुमिका ठरणार निर्णायक, नगराध्यक्षांची निवड होणार एका वर्षासाठी.

माजलगाव नगरपरिषदेचा नुतन नगराध्यक्ष जनविकासचा की राष्ट्रवादीचा?

sakal_logo
By
कमलेश जाब्रस

माजलगाव (बीड) : नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडीमध्ये आमदार प्रकाश सोळंके व मोहन जगताप यांनी एकत्र येत या निवडी केल्या. उपनगराध्यक्ष सुमन मुंडे यांनी नगराध्यक्षाचा पदभार घेतांना देखील सोळंके जगताप यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. आता नगरसेवकांतून होणा-या नगराध्यक्षांच्या निवडणुकीत जगताप-सोळंकेंची युती कायम राहिल्यास नगराध्यक्ष जनविकास आघाडीचा होणार का? राष्ट्वादीचा होणार यावर नऊ नोव्हेंबरला शिक्कामोर्तब होणार आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

गैरहजरीच्या कारणावरून नगराध्यक्ष सहाल चाउस यांना बडतर्फ केल्यानंतर रिक्त जागेवर नगराध्यक्ष निवडण्यासाठी जिल्हाधिका-यांनी बुधवारी निवडणूक कार्यक्रम जाहिर केला. येथील नगर पालिकेत भाजपा व जनविकास आघाडीची सत्ता आहे. भाजपाचे तत्कालिन आमदार आर. टी. देशमुख यांनी जनविकास आघाडीला पुरस्कृत करत नगराध्यक्ष सहाल चाउस यांना पाठींबा दिला होता. पहिल्यांदाच जनतेतून झालेल्या निवडवणुकीत चाऊस विजयी झाले होते. त्यांनी नगराध्यक्ष म्हणून तीन वर्षे काम केले. पालिकेत कोट्यावधी रूपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी नगराध्यक्ष चाउस यांचेसह पालिकेचे तीन तत्कालिन मुख्याधिकारी यांच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात चार मार्चला चाउस यांना अटक झाली. पालिकेत भाजपाच्या उपनगराध्यक्षा सुमन मुंडे यांना जिल्हाधिका-यांच्या परवानगीने नगराध्यक्षपदाचा पदभार मिळाला होता. दरम्यान नगराध्यक्षपद रिक्त असल्याने निवडणूक घ्यावी म्हणून मुख्याधिका-यांनी जिल्हाधिका-यांना प्रस्ताव पाठविला होता. यावर बुधवारी जिल्हाधिका-यांनी येत्या ९ नोव्हेंबरला नगरसेवकांतुन नगराध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. पालिकेचा कालावधी एक वर्षाचा राहिल्याने नगराध्यक्षपदाची ही निवड एक वर्षांसाठी असणार आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जगतापांची भूमिका ठरणार निर्णायक 

नगरपालिकेमध्ये राष्ट्वादी कॉग्रेसचे सात नगरसेवक असुन जनविकास आघाडीचे आठ नगरसेवक आहेत. राष्ट्वादी कॉग्रेसचा एक सदस्य एका गुन्ह्यांमध्ये फरार आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असुन याच धर्तीवर राष्ट्वादी कॉग्रेस, शिवसेना एकत्र येईल असे असले. तरीही मोहन जगताप यांच्या जनविकास आघाडीच्या आठ नगरसेवकांना वेगळे महत्व येणार आहे. जनविकास आघाडीचा नगराध्यक्ष होणार का? राष्ट्वादी कॉग्रेसचा नगराध्यक्ष होणार? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

घोडेबाजार मात्र निश्चितच 
नगरसेवकांतुन पहिल्यांदाच नगराध्यक्ष युती शासनाच्या काळात थेट जनतेतुन नगराध्यक्ष निवडीचा नियम करण्यात आला होता. परंतु आघाडी सरकारने मात्र या नियमात बदल करत नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवडीचा अधिनियम केला असल्याने पहिल्यांदाच नगरसेवकातून नगराध्यक्ष होण्याचा मान या पालिका नगराध्यक्षास मिळणार आहे. असे असले तरी नगरसेवकांचा घोडेबाजार मात्र निश्चीत होउ शकतो.

पालिकेतील पक्षीय बलाबल
 

  • जनविकास आघाडी - ०८.
  • भाजप - ०५.
  • शिवसेना -०२.
  • राष्ट्रवादी - ०७
  • एमआयएम. - ०१.

(संपादन-प्रताप अवचार)