गोदावरी नदीत अंघोळीला जाताना वीज तार पडली अंगावर,एकाचा मृत्यू

गोदावरी नदीच्या पात्रात दोन ज्येष्ठ नागरिक जात होते. वीजपुरवठा करणारी तार एकाच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Electricity Shock
Electricity Shock

जातेगाव (जि.बीड) : गोदावरी नदीच्या (Godavari River) पात्रात दोन ज्येष्ठ नागरिक जात असताना वीजपुरवठा करणारी तार एका वृध्दाच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एक गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी (ता.आठ) भोगलगाव येथे घडली. धोंडीराम रामा कांबळे (वय ६५, रा. भोगलगाव, ता.गेवराई) असे मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव असून शुक्रवार राणोजी खरात आणि मृत पावलेले (Beed) धोंडीराम कांबळे हे दोघे गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळीस जात असताना वीज वाहिनीची तार अंगावर पडली. यात धोंडीराम कांबळे यांचा जागीच मृत्यू, तर राणोजी खरात गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Electricity Shock
'भाजप,शिवसेनेने राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करावी'

याबाबत तलवाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी दिली. दरम्यान, वीजपुरवठा करणाऱ्या लोंबकळत चाललेल्या तारा आणि जीर्ण झालेल्या तारा याकडे महावितरणकडुन दुर्लक्ष होत असल्याने भोगलगाव येथील वृद्ध धोंडीराम कांबळे यांचा बळी गेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com