Jafrabad Crime : विम्यासाठी केला स्वतःच्या मृत्यूचा बनाव; मजुराचा गळा दाबून केला खून, जाफराबाद पोलिसांनी लावला छडा

अल्टो कारचा अपघात घडून जळालेल्या अवस्थेत स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव करून उत्तर प्रदेशातील मजुराचा खून करणाऱ्या तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल.
 crime

crime

ESakal

Updated on

जाफराबाद - नाशिक येथील महिलेच्या त्रासापासून सुटका होण्यासाठी व विम्याची रक्कम मिळविण्यासाठी अल्टो कारचा अपघात घडून जळालेल्या अवस्थेत स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव करून उत्तर प्रदेशातील मजुराचा खून करणाऱ्या तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मृत्यूचा बनाव करणारा नितीन प्रभाकर गवळी (वय-35, राहणार रूपचंद नगर, अकोला) याच्यासह त्याला मदत करणारे अमित राजू फुलारे व आकाश सुधाकर गवळी या तिघांचा संशयित आरोपीत समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com