मानवतेचा संदेश स्पर्धेचा निकाल जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

जाफराबादच्या शेख अबुसोफियान यांना प्रथम पारितोषिक

औरंगाबाद : "सकाळ' आणि "एसआयओ'तर्फे ता. 10 सप्टेंबर ते 26 ऑक्‍टोबरदरम्यान कुराण शरीफ, प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या संदेशावर घेण्यात आलेल्या "मानवतेचा संदेश' स्पर्धेच्या निकालाची सोडत गुरुवारी (ता. पाच) मान्यवरांच्या उपस्थितीत "सकाळ' कार्यालयात काढण्यात आली. 
स्पर्धेत प्रथम पारितोषिक शेख अबुसोफियान शेख शकील (दखनी मोहल्ला, जाफराबाद, जि. जालना), द्वितीय पारितोषिक सुमेरा नजीर पटेल (रा. टाकळी, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद), तर तृतीय पारितोषिक दिगंबर भजंगअय्या गजळकर (खैरी प्लॉट, जिंतूर, जि. परभणी) यांना जाहीर झाले; तसेच चतुर्थ शंभर, उत्तेजनार्थ 300 पारितोषिक विजेत्यांची सोडतसुद्धा काढण्यात आली.

हेही वाचा : प्रबोधनकार ते आदित्य, ठाकरे कुटुंबातील चौथी पिढी काय करते? वाचा.... 

जिल्हा परिषद माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, पोलिस उपायुक्त राहुल खाडे, "सकाळ'च्या मराठवाडा आवृत्तीचे संपादक संजय वरकड, व्यवस्थापक (वितरण) संजय चिकटे, "स्टुडंट्‌स इस्लामिक ऑर्गनायझेशन'चे डॉ. उमर खान, शेख नासेर, उमेर तौसिफ, शेख सवीद यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली. 
स्पर्धेतील विजेत्यांनी लवकरच एका विशेष कार्यक्रमात पारितोषिक वितरित केले जाणार असून, कार्यक्रमाची तारीख लवकरच कळविली जाईल. स्पर्धेत प्रथम पारितोषिक 31 हजार, द्वितीय 21, तृतीय 11 हजार रुपये असे आहे. चतुर्थ पारितोषिक मिळालेल्या 100 विजेत्यांना ट्रॅव्हल्स बॅग, तर उत्तेजनार्थ 300 विजेत्यांना आकर्षक पारितोषिक दिले जाणार आहे.

हेही वाचा : मंगळसूत्र घेऊन विद्यार्थी पोचले ठाण्यात 

10 सप्टेंबर ते 26 ऑक्‍टोबरदरम्यान घेण्यात आलेली ही स्पर्धा सर्वांसाठी खुली होती. यामध्ये कुराण शरीफ आणि प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या शांतीच्या संदेशावर आधारित 45 प्रश्‍न विचारण्यात आले होते. त्यापैकी 40 उत्तरांचे कुपन पाठविणे आवश्‍यक होते. अचूक उत्तरे पाठविलेले कुपन एकत्रित करून त्याची मान्यवरांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाची तारीख लवकरच कळविली जाणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manavtecha sandesh sakal marathwada competition