Maratha Reservation : कायदा होईपर्यंत थांबणार नाही : मनोज जरांगे ; पाच महिन्यांनंतर आले घरी,गावात जंगी स्वागत, कुटुंबीयांकडून औक्षण

मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत थांबता येणार नाही. १० फेब्रुवारीला मी मराठा समाजाला आवाहन करणार. या अध्यादेशाचे रूपांतर कायद्यात रूपांतर झाल्याशिवाय मी थांबणार नाही. मी ता.१० फेब्रुवारीला बेमुदत उपोषण करण्याचा कठोर निर्णय समाजासाठी घेतला आहे असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

अंकुशनगर : मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत थांबता येणार नाही. १० फेब्रुवारीला मी मराठा समाजाला आवाहन करणार. या अध्यादेशाचे रूपांतर कायद्यात रूपांतर झाल्याशिवाय मी थांबणार नाही. मी ता.१० फेब्रुवारीला बेमुदत उपोषण करण्याचा कठोर निर्णय समाजासाठी घेतला आहे असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

sambhaji nagar
Maratha Reservation : हे तर 'ओबीसी'च्या विरोधात षडयंत्र! ओबीसी बांधवांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

पाच महिन्यानंतर जरांगे अंकुशनगर येथील घरी गुरूवारी आले. यावेळी त्यांनी आपली पुढील भूमिका स्पष्ट केली. दरम्यान कर्मभूमीत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. घरी येताच त्यांचे औक्षण करण्यात आले. वडिलांनी त्यांना मीठी मारली. संपूर्ण जरांगे कुटुंब यावेळी भावुक झाले होते. दोन दिवसाचा पाव्हणा म्हणून मला शक्यतो राहावे लागणार आहे. समाजाच्या हट्टापायी घरी आलो. काहीतरी तडीला लावल्यावरच आलो.

कायद्यानुसार आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असेही यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान अंतरवाली सराटी ते समर्थ कारखाना गेटपर्यंत जरांगेंनी दुचाकी चालवली. समर्थ कारखाना गेटपासून त्यांची जोरदार मिरवणूक काढण्यात आली. अंकुशनगर येथील घरी पोचताच त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

पाटील घरी आले. ते म्हणाले समाज म्हणून घरी आलो आहे. पण सरकारने लवकरात लवकर आरक्षणाची अंमलबजावणी केली असती तर ते माझे पती म्हणून घरी आले असते. ते ३१ तारखेला घरी येणार होते. त्यांची वाट पाहिली पण ते आज आलेत.

- सौमित्रा जरांगे,

(मनोज जरांगेंची पत्नी)

पप्पा घरी आले पण पाहुणे म्हणून आले याचे खुप दुःख होत आहे. ही वेळ सरकारने आमच्या कुटुंबावर आणली. सरकारला थोपवल्या शिवाय आम्ही राहणार नाही. इच्छा होती पप्पाला जवळून पाहण्याची, भेटण्याची ती पूर्ण झाली. पण सरकारने सरसकट आरक्षण देऊन कायमचे वडील म्हणून पप्पांना आमच्या घरात आणून सोडावे. समाजासाठी कष्ट व त्याग आम्ही नक्कीच करू. पुढच्या वेळी पप्पा घरी येताना आरक्षणच घेऊन येतील असा विश्वास आहे.

- प्रणाली जरांगे,

(मनोज जरांगेंची मुलगी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com