Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीसच समाजात फुट पाडताहेत - मनोज जरांगे-पाटील

प्रविण दरेकर, मंगलप्रकाश लोढा यांना कोण पुढं करतंय हे फडणवीसांनी सांगावं
manoj jarange patil criticize bjp dcm devendra fadnavis politics
manoj jarange patil criticize bjp dcm devendra fadnavis politicsSakal

निलंगा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताटात जेवणारे कांही राज्यातील नेते वेगवेगळे स्टेटमेंन्ट करून गैरसमज पसरवत आहेत. त्यांना पुढं करून देवेंद्र फडणवीसच समाजात फुट पाडताहेत असा आरोप करून त्यांच्यावरचा आता विश्वास उडाला अशी टिका मराठा आरक्षण यौध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी ता. दहा रोजी निलंगा येथे पत्रकारांशी संवाद साधतांना केला.

निलंगा येथील जाहीर सभा आटोपल्यानंतर रात्री मुक्कामी निलंगा येथे होते. औशाच्या सभेला निघण्यापूर्वीच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रत्येक प्रश्नांला उत्तर द्यायची गरज नाही. ते कामातून गेले आहेत.

त्यांना आता लवकर गोळ्या सुरू करून घेतल्या म्हणजे बरं होईल असे सांगून भाजपचे नेते प्रविण दरेकर यांचा समाचारही त्यांनी यावेळी घेतला शांतता रहावी म्हणून फडणवीसांनी 'दिलगिरी' व्यक्त केली ती चुक झाली असं म्हणायचं का त्यांना आरे व्वा मग चांगला मराठ्याचा नेता आहे.

'स्वतःला मराठा म्हणून घेतो चांगलं बोलतो आया बहीणीबद्दल' का देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं त्यांना असं बोलायला तोंडावरून हात फिरवावं लागेल दरेकरांच्या गुणी माणूस मिळाला मराठ्यांना सध्या तो लोंढा का खोंढा वळवळ करतोय हे सगळेच फडणवीसांच्या ताटात जेवणारे आहेत. बघू मराठा समाज तसा नाही.

देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांच्या अंगावर किती मराठे घालणार आहेत. 'बघुया आहोत शांत शांत राहू द्या कशाला वातावरण ढवळीता अशी टिकाही त्यांनी यावेळी केली. तुमच्या डोक्यातील कांही विषारी विचार असतील तर मराठ्यांच्या डोक्यात नका उतरवू,

तुमच्या ताटात जेवणारी माणसं असे वक्तव्य करीत असातील तर चांगली गोष्ट आहे बरळा तुम्हाला काय बरळायचे ते पुढं सामना मैदान सोबतच आहे बघू समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न करू नका तुमच्यावर आता विश्वासच राहीला नाही असा गर्भित इशाराही त्यांनी माध्यमाशी बोलताना दिला.

manoj jarange patil criticize bjp dcm devendra fadnavis politics
Devendra Fadnavis : नवे हवाई वाहतूक धोरण कार्गोहबसाठी अनुकूल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कितीही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी गावगाड्यातील मराठा व ओबीसी सामाजाने एकत्र नांदायचं ठरवलं आहे. मराठा समाजावर बोलणार्या नेत्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगूनही कांही जण बरळत आहेत त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी बरळत आहेत असा पुर्नच्चारही त्यांनी यावेळी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com