बीड : ‘‘मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली न लागल्यास यावेळी इतिहास घडवणार. आता मागे फिरायचे नाही. मुंबई आमची आहे, राज्य आमचे आहे आणि हक्काचे आरक्षणही आमचेच आहे. सरकारने कितीही अडथळे आणले, पोलिसांनी कितीही ताकद लावली तरी मुंबईला जाणारच. आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही,’’ असा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज व्यक्त दिला.