बाभळगावात देशमुखांच्या गढीसमोर ठिय्या सुरु

हरी तुगावकर
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

लातूर : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सध्या मराठा समाजातील आमदार खासदार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करून निषेध केला जात आहे. यात गुरुवारी (ता. 2) बाभळगाव येथील माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या गढीसमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी देशमुख यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचेही पदाधिकाऱयांनी सहभागी होत पाठिंबा दर्शविला.

मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्च्या वतीने मराठा समाजातील आमदार खासदारांच्या घरोसमोर आंदोलन केले जात आहे. यात गुरुवारी (ता. 2) बाभळगाव येथी देशमुख यांच्या गढीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. बाभळगावात पहिल्यांदाच असे आंदोलन झाले. हे आंदोलन करण्यात येणार आहे, असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहिर करण्यात आले होते. त्यामुळे सकाळपासूनच काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक गढीवर बसून होते.

सकाळी साडेअकराच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते तेथे आले. गढीसमोरच पायऱयावर त्यांनी ठिय्या सुरु केला. त्यानंतर काँग्रेसचे काही पदाधिकारी देखील येवून या ठिय्यात सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली. 
आपल्या घऱासमोर आंदोलन होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी (ता. 1) रात्रीच देशमुख यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. 

विधीमंडळ आणि काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावरही माझ्या पाठींब्याची भुमिका वेळोवेळी मांडलेली आहे. भविष्यातही समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण लढत राहणार आहोत. आज हे सर्व समाजबांधव त्यांच्या आंदोलनाचा भाग म्हणून माझ्या बाभळगाव येथील निवासस्थानासमोर आंदोलन करण्यासाठी येत आहेत. खरे तर या समाज बांधवांशी संवाद साधण्याची माझ्यासाठी ही संधीच होती, गोव्यात सध्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि तेथील काँग्रेस पक्षाचा प्रभारी म्हणून काही पुर्वनियोजीत बैठकांसाठी मला तेथे उपस्थित राहणे अनिवार्य आहे. त्यामुळे गुरूवारी बाभळगावमध्ये येणाऱया समाजबांधवांशी चर्चा करता येणार नाही याची मला खंत आहे, असे त्यांनी या पत्रकात म्हटले आहे. ता. आठ आॅगस्ट रोजी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींशी स्वत: भेट घेऊन त्यांच्या भावना समजून घेणार असल्याचेही श्री. देशमुख यांनी म्हटले आहे.

Web Title: maratha kranti morcha agitation in front of MLA amit deshmukh