Maratha Kranti Morcha : लातूर शहरात सर्वत्र धुराचे लोट

हरी तुगावकर 
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

लातूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करीता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी (ता. ९) लातूर बंदचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळपासूनच सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी सगळे रस्ते जाम करून टाकले. त्यानंतर दुपारपासून मात्र टायर जाळण्यास सुरवात केली. त्यामुळे शहरात सर्वत्र धुराचे लोट दिसून येत होते.

टायर जाळून तरुणांनी शासनाचा निषेध नोंदवित आपल्या आक्रमक भावनांना वाट करून दिली. शहरात सकाळपासूनच शांततेत आंदोलन सुरु होते. चौका चौकात तरुण
कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. शासनाच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या जात होत्या. त्यानंतर दुपारपासून मात्र तरुणांनी टायर जाळण्याकडे आपला मोर्चा वळवला. शिवाजी चौक, नंदी स्ट़ॉप, राजीव गांधी चौक, बसवेश्वर चौक, गरुड चौक, शाहू चौक, पीव्हीआर चौक, अशोक हॉटेल, अशा अनेक ठिकाणी तसेच प्रमुख रस्त्यावर कार्यकर्ते उतरले. त्यांनी रस्त्यावरच टायर तसेच लाकडे जाळली. शहरात पाचशे पेक्षा जास्त टायर जाळण्यात आली. याचा परिणाम शहरात सर्वत्र धुराचे लोट दिसून येत होते. रस्त्यावर टायर जाळून तरुणांनी शासनाचा निषेध केला. रस्त्यावरच टायर जाळली जात असल्याने दुचाकी वाहनधारकांनाही यामुळे आतमधील रस्त्याचा वापर करावा लागला.

Web Title: Maratha Kranti Morcha : agitation in latur