Maratha Reservation : जिंतूर टी पाँइंट,आसेगाव, कुरुंदा व चोंडी येथे रास्तारोको आंदोलन; तहसिलदार यांच्या दालनात आंदोलनकर्त्यांचा फाशी घेण्याचा प्रयत्न

वसमत तालुक्यात मराठा समाजाचे आंदोलन चा़गलेच तापले आहे. शहरासह विविध गावांत
marathwada
marathwadasakal

वसमत- साखळी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सोमवारी ता.३० शहरातील व्यापारी व्यावसायिकांनी उपोषण केले. ठिकठिकाणी महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी रास्तारोको केल्याने दळणवळण विस्कळीत झाले. तर एका आंदोलनकर्त्यांने तहसिलदार यांच्या दालनातच फाशी घेण्याचा प्रयत्न केला.

वसमत तालुक्यात मराठा समाजाचे आंदोलन चा़गलेच तापले आहे. शहरासह विविध गावांत साखळी उपोषण, आमरण उपोषण सुरू आहेत. सोमवारी जिंतूर टी पाँइंट, आसेगाव, कुरुंदा, चोंडी येथे महामार्गावर रास्तारोको आंदोलन केल्याने दळणवळण विस्कळीत झाले. नांदेड रस्ता बंद झाल्याने महाविद्यालय व इ़ग्रजी शाळेत अप-डाऊन करणार्या विद्यार्थ्यांना अर्ध्या रस्त्यातून परतावे लागले. तर अनेक कर्मचारी, नागरीकांना वसमत आणि नांदेडला जाता आले नाही.

तहसिल कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु असताना दुपारी अडीच च्या दरम्यान हातात दोरी घेऊन एक आंदोलकर्ता तहसिल कार्यालयासमोर येऊन एक मराठा लाख मराठा घोषणा देत थेट तहसिलदार यांच्या दालनात शिरला. तसेच दालनातील पंख्याला फाशी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित मराठा आंदोलकांनी त्याला धरुन कार्यालयाच्या बाहेर काढले. यावेळी तहसिलदार शारदा दळवी हा प्रकार पाहून काहीकाळ आवाक झाल्या.

marathwada
Shravan Maas: श्रावण मासानिमित्त भाविकांचा ओघ नाशिककडे! विविध मंदिरात भक्तांची मांदियाळी

पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी वसमत बंदची हाक.

पोलिसांनी मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यावर दोन गुन्हे दाखल केले आहेत. याचा निषेध म्हणून मंगळवारी ता.३१ वसमत शहर बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने तहसिलदार शारदा दळवी यांना देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com