Maratha Reservation : पोलिस माजलगावला गुंतले अन॒ धोका बीडमध्ये घडला

हिंसक आंदोलनाचा नव्हता यंत्रणेला अंदाज; राग शांत व्हावा म्हणून दुपारपासून दुर्लक्षही
beed
beedsakal

बीड - शहरात हिंसक आंदोलन होईल असा पोलिस यंत्रणेला अंदाज नव्हता. तसेच, सकाळी माजलगावला ्रपकाश सोळंके यांच्या घरावर तसेच शासकीय कार्यालयांवर दगडफेक आणि जाळपोळ अटोक्यात आणण्यासाठी खुद्द पोलिस अधीक्षक मोठा फौजफाटा घेऊन माजलगावला तळ ठोकून होते. याच काळात बीडमध्ये आंदोलन हिंसक झालेअाणि हाताबाहेर गेले.

सोमवारी (ता. ३०) सकाळी कथीत ऑडीओ क्लीपमधील संभाषणावरुन राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगावच्या घरावर हजारांहूनअधिक आंदोलकांनी दगडफेक केली. तसेच, दारातील वाहने जाळून बंगल्याची तोडफोड केली. याची माहिती मिळताच, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर मोठा फौजफाटा घेऊन माजलगावकडे रवाना झाले.

यानंतर माजलगावात आंदोलकांनी नगर पालिकेला आग लावली तसेच सोळंके महाविद्यालयाचीही तोडफोड केली. पंचायत समितीवरही दगडफेक आणि शहरातून मोर्चा यामुळे माजलगावची परिस्थिती अटोक्यात आणण्यासाठी पोलिस दल ्रपयत्न करत होते. या वेळेत शहरातील कार्यालये बंद केली जात होती.

beed
Marathwada : मराठा आरक्षणासाठी रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र...

आंदेालकांचा राग शांत व्हावा म्हणून प्रशासनाने संयमाची भूमिका घेतली होती. मुळात बीडमध्ये आंदोलन हिंसक होईल, याचा अंदाज ्रपशासनाला नव्हताच. मात्र, जाळपोळ आणि दगडफेकीचे ्रपकारही वाढले. त्यामुळे प्रशासनाने रात्री शहरात मोठ्या फौजफाट्यासह गस्त वाढविली. खुद्द जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर रस्त्यावर उरतल्याने परिस्थिती अटोक्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com