#MarathaKrantiMorcha लातुरात शिक्षण उपसंचालकांना घेराव

हरी तुगावकर
मंगळवार, 24 जुलै 2018

मराठा समाजाला शैक्षणिक शुल्कात पन्नास टक्के सवलत देण्यात आल्याचे राज्य शासन सातत्याने सांगत आहे, याचा आदेश दाखवावा या मागणीकरीता मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण उपसंचालकांनाच घेराव घातला. पण याचा आदेशच नसल्याने उपसंचालकही या कार्यकर्त्यासमोर हतबल झाले होते. मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्याच्या नावाने बोंबाही मारल्या.
 

लातूर - मराठा समाजाला शैक्षणिक शुल्कात पन्नास टक्के सवलत देण्यात आल्याचे राज्य शासन सातत्याने सांगत आहे, याचा आदेश दाखवावा या मागणीकरीता मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण उपसंचालकांनाच घेराव घातला. पण याचा आदेशच नसल्याने उपसंचालकही या कार्यकर्त्यासमोर हतबल झाले होते. मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्याच्या नावाने बोंबाही मारल्या.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात पन्नास टक्के सवलत देण्यात आल्याचे राज्य शासन सातत्याने सांगत आहेत. पण अद्याप याचा आदेशच काढण्यात आलेला नाही. मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने मंगळवारी झालेल्या लातूर बंदच्या दरम्यान काही कार्यकर्त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालय गाठले. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्कात पन्नास टक्केची सवलत देणारा आदेश दाखविण्याची मागणी त्यांनी शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांना केली. पण त्यांच्याकडे हा आदेशच नव्हता.

वरिष्ठ कार्यालयाशी त्यांनी संपर्क साधला. तेथून अद्याप असा आदेशच निघाला नसल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर चिडलेल्या कार्यकर्त्यांनी उपसंचालक खांडके यांना त्यांच्याच कार्यालयात घेराव घातला. यावेळी आदोलकांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांविरुध्द जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्या नावाने बोंब ठोकली. त्यानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्कात 50 टक्के सलवतीचा आदेश निघाला नाही. खांडके यांनी लेखी दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी कार्यालय सोडले.

Web Title: MarathaKrantiMorcha laid siege of Deputy Director of Education in Latur