#MarathaKrantiMorcha लातूर बंदला मोठा प्रतिसाद

हरी तुगावकर 
मंगळवार, 24 जुलै 2018

लातूर - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एका तरुणाने जलसमाधी घेतल्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून, याला लातूर जिल्ह्यात याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरातील सर्व शाळा, क्लासेस बंद ठेवण्यात आली आहेत. शहरातील सर्व बाजारपेठाही बंद करण्यात आल्या आहेत. एस. टी. बसेसही बंद करण्यात आल्या आहेत. 

शहरात मराठी क्रांती मोर्चाचे तरुण मोटार सायकलवर फिरून बंदचे आवाहन करीत आहेत. मराठा आरक्षणासाठी गंगापूर तालुक्यातील कायगाव टोक येथे काल काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेतली होती. त्याताच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. 

सकाळपासूनच तरुण रस्त्यावर उतरले आहेत. ठिकठिकाणी मोटार सायकलवर जावून ते बाजारपेठ बंद करीत आहेत. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, क्लासेस, बाजारपेठा बंद करण्यात आल्या  आहेत. एसटी बसेस बंद आहेत. शहरातील सार्वजनिक वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे. शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: #MarathaKrantiMorcha Large response to Latur band