esakal | ज्वलनशील पदार्थाची विक्री प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

crime

ज्वलनशील पदार्थाची विक्री प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

sakal_logo
By
जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील जळकोट परिसरात बायोडिझेल सदृश्य ज्वलनशील पदार्थाची साठवणुक आणि विक्री केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध पोलिसात शुक्रवारी (ता.10) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे.

आलियाबाद आणि जळकोट परिसरात बायोडिझेल या ज्वलनशील पदार्थाची साठवणूक आणि विक्री केल्याबद्दल खासिम पापा मिया जमादार, शेषराव शंकर काळे, सचिन दगडू हासुरे, दिनकर प्रभाकर सुरवसे, सत्यनारायण शिवाजी कदम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात महसूल प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा: अखेर मनोहरमामाला बारामती पोलिसांनी साताऱ्यात पकडले

तसेच सुमारे 9 हजार 630 लिटर्स ज्वलनशील पदाथ॔ 7 लाख 70 हजार चारशे रुपये किंमतीचा पदाथ॔ जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात महसूल खात्याच्या वतीने गुरुवारी ता.9 रात्री बारा वाजल्यापासून वरील कारवाई करण्यात आली आहे. जळकोट येथील हॉटेल गारवाच्या पाठीमागील बाजूस खोलीमध्ये पाहणी केली असता बायोडिझेल सदृश्य ज्वलनशील वस्तूचा वीस लिटर बायो डीझेल ज्वलनशील पदार्थ आढळून आला. तसेच एका बॅरेल मध्ये अंदाजे पाच लिटर द्रव पदार्थ आढळून आला आहे.

पथकाने चौकशी केली असता खासिम पापा मिया जमादार (वय 53) हे सदर बायोडिझेलची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच गणेश धाबा याठिकाणी महसूल प्रशासनाने छापा मारला असता सहा टाक्यांमध्ये सुमारे चारशे पन्नास लिटर ज्वलनशील बायोडिझेल होते. हा पदार्थ सत्यनारायण शिवाजी कदम (वय 34) याच्या ताब्यात असल्याचे दिसून आले. हॉटेल महाराजा च्या पाठीमागील बाजूस असलेल्या पत्रा शेड मध्ये पाहणी केली असता दोन हजार लिटरचे सरिता कंपनीचे पाच रिकामे बॅरेल होते आणि 35 ते 40 लिटर क्षमतेचे सात रिकामे बॅरेल आढळले आहेत. सदर बॅरेलचा वास ज्वलनशील पदार्थाचा असल्याचे जाणवले.

हेही वाचा: अकलूजकरांनी केले गणरायाचे उत्साहात स्वागत

शेषराव शंकर काळे यांच्या ताब्यात सदरचे बायोडिझेल होते. आलियाबाद तालुका तुळजापूर येथील सोलापूर ते हैदराबाद रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या रामदेव हॉटेल पाठीमागे एका पत्रा शेड मध्ये 600 ते 650 लीटर डिझेल सदृश पदाथ॔ दिसून आला. पंचनामा केल्यानंतर शेडमध्ये 600 ते 650 लीटर बायोडिझेल सदृश पदाथ॔ असल्याचे दिसून आले. आजूबाजूला चौकशी केली असता सदर चे शेड सचिन दगडू हासूरे (वय 35) राहणार जळकोट तालुका तुळजापूर यांचे ताब्यात असल्याची माहिती मिळाली. यासंदर्भात कारवाई करण्यात आली आहे. हॉटेल जय शंकर च्या पाठीमागे पत्रा शेड मध्ये पाहणी केली असता पत्राशेडला कुलूप आढळून आले. त्यामध्ये पाहणी केली असता बायोडिझेल ज्वलनशील पदार्थ आढळून आला.

या ठिकाणी 8 हजार 500 लीटर ज्वलनशील पदाथ॔ दिसून आला. तसेच सदरील ठिकाणी उर्वरित आठ टाक्या रिकाम्या दिसून आल्या. सदरचे पत्राशेड दिनकर प्रभाकर सुरवसे (वय 35) राहणार जळकोट तालुका तुळजापूर यांचे असल्याचे दिसून आले. यासंदर्भात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशान्वये उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात महसूल प्रशासनाने नियुक्त केलेल्या पाच पथकाने तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह नायब तहसीलदार अमित भारती,नायब तहसिलदार संतोष पाटील, मंडळाधिकारी नेमीचंद शिंदे,अमर गांधले, पवन भोकरे,अशोक भातभागे, तलाठी परमेश्वर शेवाळे, आबासाहेब सुरवसे, गणेश जगताप, दयानंद काळे, तुकाराम कदम यांच्यासह पथकाने कारवाई केली आहे.

यासंदर्भात पुरवठा निरीक्षण अधिकारी संदीप लक्ष्मण जाधव यांच्या फिर्यादीनुसार नळदुग॔ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत हवालदार श्री जोशी, हवालदार श्री कांबळे, हवालदार बांगर, हवालदार गायकवाड,हवालदार पाटील यांच्यासह पथके नेमून तलाठी श्री काळे, कोतवाल सुरेश वाघमारे यांच्यासह अनेकांनी या कारवाईत सहभाग नोंदविला. यासंदर्भात तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत करीत आहेत.पोलिसांनी आणि प्रशासनाने बायोडिझेल ज्वलनशील पदाथ॔ वस्तू बाबत मानवी जीवन धोक्यात येईल याबाबत विक्री व बाळगल्या प्रकरणी भारतीय दंड संहिता 285 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

loading image
go to top