
MP Joins Rescue Operation in Flood Hit Marathwada Region
Esakal
गेल्या आठवड्याभरापासून राज्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. मराठवाड्यात पावसाने हाहाकार उडाला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालीय. अचानक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं लोक अडकून पडले आहेत. रस्ते बंद झाले असून दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालंय. धाराशिव, सोलापूर, बीड, हिंगोली, जालना, सातारा जिल्ह्यांना पावसानं झोडपलंय. अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. तर पुरात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफसह बचाव पथके कार्यरत आहेत.