esakal | अतिवृष्टीतील नुकसानीचे सरसकट पंचनामे करा : माजीमंत्री निलंगेकर  
sakal

बोलून बातमी शोधा

sanbhaji pati;l.jpg

राज्यात महाआघाडी सरकार मुंबई व पुणे याकडेच लक्ष देते. लातूरमध्ये शेतकर्‍यांच्या रब्बी हंगामात सोयाबीन नुकसान पिकाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असतानाही राज्य सरकार व विमा कंपन्या याकडे लक्ष देत नाहीत. लातूर हे महाराष्ट्राच्या नकाशात आहे किंवा नाही? असा प्रश्नही निलंगेकर यांनी उपस्थित केला आहे.

अतिवृष्टीतील नुकसानीचे सरसकट पंचनामे करा : माजीमंत्री निलंगेकर  

sakal_logo
By
राम काळगे

निलंगा (लातूर) : नैसर्गिक आपत्ती, कीड-रोग, हवामान बदल अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्याला विमा कवच दिले जाते. मात्र या खरीप हंगामात सोयाबीनच्या हिरव्या शेंगाला कोंब फुटल्याने शेतकऱ्यांना विमा द्यायचा कसा? कारण कोंब फुटणे हे विमा कंपनीच्या निकषा बाहेर आहे. असे असले तरी अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पिकाचे सरसकट पंचनामे करा, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मंगळवारी (ता.२२) पत्रकार परिषदेत केली. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

निलंगा विधानसभा मतदारसंघात शेतकरी कोरोना महामारीमुळे अगोदरच अडचणीत असताना खरीप हंगामात दुबार, तिबार पेरणी करूनही सोयाबीन अतिवृष्टीमुळे त्यास कोंब फुटू लागले आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. राज्यसरकार व विमा कंपनीच्या समोरही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायची कशी? कारण कोंब फुटून नुकसान होण्याची प्रक्रिया पहिल्यांदाच या भागात घडली आहे. यामुळेच राज्य सरकार व विमा कंपन्या याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी उशीर होत आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

केवळ नदी, ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या पीकाचेच पंचनामे करण्याचे आदेश असून ही प्रक्रिया संथ गतीने सुरु आहे. आजही तलाठी, ग्रामसेवक व कृषीसहाय्यक यांना पंचनामे करण्याचे आदेश नाहीत. फक्त नदी-नाले काठच्या शेतकऱ्यांचे पंचनामे होत आहेत. असे सांगून उभे पीक असताना सततच्या पावसामुळे हिरव्या पीकाला कोंब फुटू लागले आहेत. सरसकट या भागातील सोयाबीनच्या शेंगांना कोंब  फुटत असल्याने कोट्यावधी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्याच्या एवढ्या गंभीर प्रश्नाकडे जिल्ह्याचे पालकमंत्री याकडे लक्ष देत नाहीत. विमा कंपनी ही व सरकार  याकडे लक्ष देत नाही. सोयाबीनला शेंगाला कोंब फुटणे हा निकष विमा कंपनीच्या नियमात नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे .यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कृषी मंत्री बाळासाहेब थोरात पालकमंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन विमा कंपनीच्या निकषात बदल करून कोंब फुटलेल्या सर्व शेतकऱ्याचे पंचनामे करण्यासाठी व त्यांना २५% आगाऊ रक्कम देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निलंगेकर यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्य सरकारचे लातूर कडे दुर्लक्ष
राज्यात महाआघाडी सरकार मुंबई व पुणे याकडेच लक्ष देते. लातूरमध्ये शेतकर्‍यांच्या रब्बी हंगामात सोयाबीन नुकसान पिकाचे       कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असतानाही राज्य सरकार व विमा कंपन्या याकडे लक्ष देत नाहीत. लातूर हे महाराष्ट्राच्या नकाशात आहे किंवा नाही? असा प्रश्नही निलंगेकर यांनी उपस्थित केला आहे. राज्यसरकार व विमा कंपनीने शेतकऱ्यांना खरीपाचा नुकसान भरपाई नाही दिली तर राज्यसरकार व विमा कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


(संपादन-प्रताप अवचार)