Marathwada : आरक्षणासाठी शोलेस्टाइल आंदोलन

आनंदगाव येथे तरुण चढले जलकुंभावर
Marathwada news
Marathwada newsesakal

आष्टी : धनगर आरक्षणाचे लोण खेड्यापाड्यांत पोहोचले आहे. आनंदगाव (ता.परतूर) येथील धनगर समाजातील तरुणांनी चक्क शोलेस्टाइल आंदोलन करून यंत्रणेला हादरविले. प्रशासनाकडून झालेल्या दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आंदोलक जलकुंभावरून खाली उतरले.

Marathwada news
Hair Care Tips : हिवाळ्यात कोंड्यामुळे केसांमध्ये खाज सुटते? मग, फॉलो करा ‘या’ टीप्स

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देत त्याप्रमाणे सवलती देण्यात याव्यात या मागणीसाठी आनंदगाव येथील तरुणांनी जलकुंभावर चढून आंदोलन केले. हातात पिवळे झेंडे, येळकोट येळकोट जय मल्हार अशी घोषणा देत आरक्षणाची मागणी ते करीत होते.

Marathwada news
Geyser Precaution Tips : हिवाळ्यात गिझरची सर्व्हिसिंग गरजेची, अन्यथा होऊ शकते मोठी दुर्घटना

आरडाओरड ऐकून त्यांचे कुटुंबीय, ग्रामस्थ घटनास्थळी पोचले. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांसह महसूल विभागातील अधिकारी देखील घटनास्थळी आले. सर्वांकडून आंदोलनकर्त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. पण ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. राज्य सरकारने समित्या स्थापन करून वेळ घालवण्यापेक्षा लवकरात लवकर धनगर समाजाला एसटीतून आरक्षण आणि त्याप्रमाणे सवलती देण्यात याव्यात अशी मागणी ते करीत होते.

अखेर दोन तास चाललेले हे शोलेस्टाईल आंदोलन प्रशासनाच्या मनधरणीनंतर मागे घेत आंदोलक खाली उतरले. त्यानंतर पोलिस, महसूल विभागाने त्यांच्या मागणीचे निवेदन स्वीकारले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ नरके, महसूल विभागाचे प्रताप राऊत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com