Latur : अहमदपूरमध्ये सासू, सासऱ्यामुळे सुनेने केली आत्महत्या; गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latur Crime News
Latur : अहमदपूरमध्ये सासू, सासऱ्यामुळे सुनेने केली आत्महत्या; गुन्हा दाखल

Latur : अहमदपूरमध्ये सासू, सासऱ्यामुळे सुनेने केली आत्महत्या; गुन्हा दाखल

अहमदपूर (जि.लातूर) : तालुक्यातील देवकरा येथे सुनेस आत्महत्येस परावृत्त  केल्याने सासू सासऱ्यावर गुन्हा नोंद झाल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील देवकरा येथील अनिता योगीराज गुट्टे ( वय 32 , ह.मु किनगाव) हिने रविवारी (ता.दोन) सकाळी सहाच्या सुमारास चाटेवाडी (Latur) शिवारातील पळसाच्या झाडाला ओढणीने गळफास घेतला. ही घटना वाऱ्यासारखी पसरली. किनगाव (Ahmedpur) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृताचा मृतदेह आणण्यात आला.(Married Woman Committed Suicide Due To In Laws In Ahmedpur Taluka Of Latur)

हेही वाचा: सुखी संसाराचा शेवट,एकाच दोरीने गळफास घेऊन पती-पत्नीची आत्महत्या

माहेरकडील मंडळींची गुन्हा दाखल करण्याची मागणी

मागील सहा महिन्यांपासून अनिताचे सासू व सासरे तू लेकर बाळ व नवऱ्याला घेऊन मुंबईला जा असे म्हणत त्रास देत होते. या त्रासातूनच माझ्या मुलीचा जीव गेला केली, अशी तक्रार मृताचे वडील बळीराम पंढरी फड (रा.कोष्टगाव, ता.रेणापूर) यांनी तक्रार दिली. सासरे नामदेव सोपान गुट्टे व सासू प्रयागबाई नामदेव गुट्टे (रा. देवकरा, ह. मु. किनगाव) यांच्यावर आत्महत्येस परावृत्त करण्या संदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शैलेश बंकवाड करीत आहेत.

हेही वाचा: धक्कादायक! मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात तब्बल 50 सापांचा मृत्यू

रविवारी गुन्हा नोंद

रात्री उशीरा झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातून मृतदेह सोमवारी ( ता.तीन) सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्रातून मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतले व अंत्यसंस्कार करण्यासाठी मृताचे माहेर असलेल्या कोष्टगाव येथे नेण्यात आले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Latur
loading image
go to top