

Thousands March in Umerga Opposing SC Reservation Sub-Classification Policy
esakal
-अविनाश काळे
उमरगा: महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे 'अ, ब, क, ड' असे उपवर्गीकरण करण्याचा घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात 'अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समिती'च्या वतीने शुक्रवारी (ता. तीन) काढण्यात आलेल्या भव्य महामोर्चाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बांधलेली ५९ जातींची वज्रमुठ तोडण्याचे हे राजकीय षडयंत्र असल्याचा संतप्त आरोप करत, हजारो भीमसैनिकांनी या उपवर्गीकरणाविरोधात एकमुखी एल्गार पुकारला.