

Cylinder Blast Sparks Fire, Leaves Family Homeless in Ambajogai Village
esakal
घाटनांदूर : पट्टीवडगाव (ता.अंबाजोगाई) येथे आज सकाळी साडे नऊच्या सुमारास गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नीच्या निधनानंतर दहाव्याच्या विधीसाठी स्वयंपाक सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. या आगीत दोन घरे आणि घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.