आव्हानाची विशेष ग्रामसभा ठरली वादळी 

भोकरदन : आव्हाना येथील ग्रामसभेत उडालेला गोंधळ.
भोकरदन : आव्हाना येथील ग्रामसभेत उडालेला गोंधळ.

भोकरदन (जि.जालना) -  तालुक्यातील आव्हाना हे गाव भोकरदन तालुक्यातच ठेवायचे की सिल्लोड तालुक्यात समाविष्ट करायचे यावर गेल्या अनेक वर्षापासून वाद सुरू आहे. याच अनुषंगाने बुधवारी (ता.२६) घेण्यात आलेली विशेष ग्रामसभा चांगलीच वादळी ठरली. 

आव्हाना या गावाचा सिल्लोड तालुक्यात समावेश करावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून काही ग्रामस्थ करीत आहे. यासाठी अनेकदा विशेष ग्रामसभा देखील घेण्यात आल्या. परंतु प्रत्येक वेळी सभेतील गोंधळामुळे या निर्णयावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी जालना यांनी हे प्रकरण निकाली काढण्यासाठी बुधवारी विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुषंगाने बुधवारी सकाळी साडेदहा वाजता पंचायत समितीच्यावतीने विस्ताराधिकारी इंगळे व त्यांचे सहकारी तहसील प्रशासनाच्यावतीने तलाठी अभय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत ग्रामसभेला सुरुवात झाली. यावेळी काही ग्रामस्थांनी गुप्त मतदानाची मागणी केली. परंतु उपस्थित ग्रामस्थांची मोजणी करून बहुमत तपासले जाईल असे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले.

या दरम्यान उशिरा आलेल्या काही ग्रामस्थांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही असे अधिकाऱ्यांनी सांगताच ग्रामसभेत गोंधळ होवून तणावाचे वातावरण निर्माण झाले. या गोंधळातच १६५ सदस्य भोकरदन तालुक्याच्या बाजूने व १३७ सदस्य हे सिल्लोड तालुक्याच्या बाजूनी असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी गवळी यांनी यावेळी दिली. 

यापूर्वी सिल्लोडला दिली होती पसंती... 

वर्ष २००१ साली आव्हाना गावाचा सिल्लोडमध्ये समावेश करावा असा ठराव पास झाला होता व त्यावर शासनाने कारवाई करून राजपत्र मध्ये आव्हाना गाव सिल्लोड तालुक्यात समाविष्ट करण्याबाबत प्रसिद्धीही दिली होती. परंतु काही ग्रामस्थांनी त्यावेळेला अक्षेप दाखल केल्यामुळे सदर कार्यवाही पूर्ण होऊ शकली नाही. 

ही ग्रामसभा राजकीय दबावापोटी खोट्या सह्या घेऊन पूर्ण झाल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केल्या गेला असून, ही ग्रामसभा आम्हाला मान्य नाही. विशेष म्हणजे ग्रामसभा घेण्याची कुठलीही आवश्यकता नसताना पुन्हा ग्रामसभा का घेण्यात आली. या विरोधात आक्षेप घेवून वरिष्ठांकडे तक्रार दाखल करणार आहे. 
- अरुण गावंडे, 
माजी उपसरपंच,आव्हाना 

गावात झालेल्या विकासकामांच्या बाजूने ग्रामस्थांनी कौल दिला असून, यापुढेही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहू 
वैशाली गावंडे, 
सभापती पंचायत समिती, भोकरदन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com