अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार विजयी संकल्प बैठक

latur
latur

लातूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. 6) येथे लातूर, उस्मानाबाद, नांदेड व हिंगोली या चार जिल्ह्यातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. संघटनात्मक तयारीसोबतच आगामी निवडणुकीसंदर्भात विजयाचा संकल्प करणारी ही बैठक आहे. या बैठकीला साडे पाच हजार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी बुधवारी (ता. 2) येथे पत्रकार परिषदेत दिली.

भारतीय जनता पक्षासाठी हा ऐतिहासिक दिवस असणार आहे. शहा संघटनात्मक रचनेतून प्रवास करीत आहेत. यातून ते लातूरला येत आहेत. रविवारी (ता. 6) त्यांचा येथे मुक्कामही असणार आहे. मराठवाड्यातून त्यांचा प्रवास सुरु होत आहे, ही आनंदाची बाब आहे. या बैठकीच्या माध्यमातून शहा हे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत. चार जिल्ह्यातील पाच हजार 713 कार्यकर्ते या बैठकीत सहभागी होणार आहेत. पाच वर्षात शासनाने केलेली विकास कामे, त्यात कार्यकर्त्यांचा सहयोग, संघटनात्मक तयारी याविषयावरही चर्चा होणार आहे. विजयाच्या संकल्पासोबतच कार्यकर्त्यांना उर्जा देणारी ही बैठक राहील, असे निलंगेकर म्हणाले.

राज्यात चार जिल्ह्यांचा एक क्लस्टर तयार करण्यात आला आहे. लातूर, उस्मानाबाद, नांदेड व हिंगोली या क्लस्टरची ही बैठक आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संघटनमंत्री विजय पुराणिक, भाऊराव देशमुख हे देखील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक बुथ जिंकण्याचा संकल्पही यावेळी केला जाणार आहे, असे श्री. निलंगेकर म्हणाले. यावेळी महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, स्थायी समितीचे सभापती अॅड. शैलेश गोजमगुंडे, शहराध्यक्ष शैलेश लाहोटी, नगरसेवक गुरुनाथ मगे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com