'मानवतेचा संदेश'मधील विजेत्यांना देणार पारितोषिके

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

कुराण शरीफ आणि प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या शांतीच्या संदेशावर आधारित 45 प्रश्‍न विचारण्यात आले होते. त्यापैकी 40 उत्तरांचे कुपन पाठविणे आवश्‍यक होते. अचूक उत्तरे पाठविलेले कुपन एकत्रित करून त्यांची मान्यवरांच्या हस्ते सोडत काढण्यात आली.

औरंगाबाद : 'सकाळ माध्यम समूह' आणि "एसआयओ'तर्फे ता. 10 सप्टेंबर ते 26 ऑक्‍टोबरदरम्यान कुराण शरीफ, प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या संदेशावर "मानवतेचा संदेश' ही स्पर्धा घेण्यात आली होती.

स्पर्धेतील विजेत्यांना गुरुवारी (ता. 12) मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण केले जाईल. सायंकाळी पाच वाजता मराठवाडा महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमात व्याख्याते डॉ. रफिक पारनेरकर "मानवतेचा संदेश' या विषयावर आपले विचार व्यक्त करतील. 

हिंदुहृदयसम्राट शब्द उच्चारत ठाकरेंबद्दल काय म्हणाले हे पाटील?

स्पर्धेत प्रथम पारितोषिक शेख अबुसोफियान शेख शकील (दखनी मोहल्ला, जाफराबाद, जि. जालना), द्वितीय पारितोषिक सुमेरा नजीर पटेल (रा. टाकळी, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद), तर तृतीय पारितोषिक दिगंबर भुजंगअय्या गजळकर (खैरी प्लॉट, जिंतूर, जि. परभणी) यांना जाहीर झालेले आहे. तसेच चतुर्थ शंभर, उत्तेजनार्थ 300 पारितोषिक विजेत्यांची सोडतसुद्धा काढण्यात आली होती. या सर्व विजेत्यांना याच दिवशी पारितोषिके वितरित केली जातील. 

पेशव्यांचा हा मुलगा का झाला होता मुसलमान?

स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक 31 हजार, द्वितीय 21, तृतीय 11 हजार रुपये असे आहे. चतुर्थ पारितोषिक मिळालेल्या 100 विजेत्यांना ट्रॅव्हल्स बॅग, तर उत्तेजनार्थ 300 विजेत्यांना आकर्षक पारितोषिक दिले जाणार आहे. 10 सप्टेंबर ते 26 ऑक्‍टोबरदरम्यान घेण्यात आलेली ही स्पर्धा सर्वांसाठी खुली होती.

मराठा समाजाच्या हिताचे निर्णय रद्द

यामध्ये कुराण शरीफ आणि प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या शांतीच्या संदेशावर आधारित 45 प्रश्‍न विचारण्यात आले होते. त्यापैकी 40 उत्तरांचे कुपन पाठविणे आवश्‍यक होते. अचूक उत्तरे पाठविलेले कुपन एकत्रित करून त्यांची मान्यवरांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. अधिक माहितीसाठी 9307089430 या क्रमांकावर संपर्क साधावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Message of Humanity, Sakal Social Connect Initiative in Aurangabad