Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patilsakal

Gangapur News : दुधाला ३४ रुपयांचा हमी भावाचे परिपत्रक काढण्याचे विखे पाटील यांचे आश्वासन

दूध दर वाढीबाबत सकारात्मक निर्णय घेणार असून, कॅबिनेटमध्ये निर्णय शेतकऱ्यांचे समाधान करणार असल्याची ग्वाही दुग्ध विकास व पशू संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

गंगापूर - दूध दर वाढीबाबत सकारात्मक निर्णय घेणार असून, कॅबिनेटमध्ये निर्णय शेतकऱ्यांचे समाधान करणार असल्याची ग्वाही दुग्ध विकास व पशू संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राज्याच्या बैठकीत मराठवाड्यातील तिघांची निवड करण्यात आली होती.

यात गंगापूर तालुक्यातील छावा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष डॉ. उद्धवराजे काळे, गंगापूर बाजार समितीचे माजी सभापती विनोद काळे, शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके यांचा समावेश होता. बैठकीत 3.2 8.3 साठी 34 रु. हमीभाव देण्याच्या मागणी करण्यात आली आहे.

यावेळी विखे पाटील यांनी सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगून भेसळ करणाऱ्यावर कठोर कारवाई करणार व दुधातील भेसळ रोखण्यासाठी भरारी पथक तयार करून भेसळ करणार्यांवर तातडीने कार्यवाही करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com