लातूरमध्ये जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया

हरी तुगावकर
रविवार, 22 सप्टेंबर 2019

येथील यशोदा चित्रपटगृहाच्या जवळ महापालिकेची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

लातूर : येथील यशोदा चित्रपटगृहाच्या जवळ महापालिकेची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

दरम्यान, तब्बल एक तास मोठे मोठे पाण्याचे फवारे पहायला मिळाले. हा प्रकार या भागातील नगरसेवक सपना किसवे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर या भागातील पाणी पुरवठा बंद करण्यात आला. तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले. सध्या शहराला महिन्यातून केवळ दोनदा पाणी पुरवठा केला जात आहे. त्यात हा प्रकार घडला आहे. शहरात अनेक ठिकाणी पाण्याची गळती होत आहे. त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: millions of liters water waste in latur