एमआयएमचा आैरंगाबादेत कॅब, एनआरसी विरोधात महामोर्चा 

योगेश पायघन
रविवार, 15 डिसेंबर 2019

निवडणुकीपूर्वी उरलेल्या चार महिन्यांसाठी आैरंगाबाद महापालिका बरखास्त करून महापालिकेचा कारभार आयुक्तांकडे सोपवला तर ते चांगली कामगिरी करतील, असा मला विश्‍वास वाटतो. उपमहापौरांनी राजीनामा कुणाकडे द्यावा हे त्यांना माहीत नाही का?'', असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. शिवाय हे भाजपाचे दबाव तंत्र असून, जनमत नसताना उरलेल्या दिवसांत अजून काय करता येईल, यासाठी सत्तेची खुर्ची सोडवत नसल्याने महापौर खुर्चीला चिटकून बसल्याचा आरोपही त्यांनी केला. 

औरंगाबाद : ""राज्य केंद्रात विरोधात आणि येथील महापालिकेत सत्तेत हे विरोधाभासी चित्र आहे. निवडणुकीपूर्वी उरलेल्या चार महिन्यांत महापालिका बरखास्त करून महापालिकेचा कारभार आयुक्तांकडे सोपवला तर ते चांगली कामगिरी करतील, असा मला विश्‍वास वाटतो. उपमहापौरांनी राजीनामा कुणाकडे द्यावा हे त्यांना माहीत नाही का?'', असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.

शिवाय हे भाजपाचे दबाव तंत्र असून, जनमत नसताना उरलेल्या दिवसांत अजून काय करता येईल, यासाठी सत्तेची खुर्ची सोडवत नसल्याने महापौर खुर्चीला चिटकून बसल्याचा आरोपही त्यांनी केला. रविवारी (ता. 15) सुभेदारी विश्रामगृहात खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा अधिवेशन व नव्याने आलेला नागरिकत्व कायद्यावर त्यांनी एमआयएमची भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा - माझ्या बापाचा पक्ष, मी कशाला बंड करू? 

या कायद्याला संविधानिक मार्गाने विरोध करत राहणार आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये. हा कायदा फक्त विशिष्ठ समुदायाला घाबरवण्यासाठी हेतूपुरस्कर त्रास देण्यासाठी बनवल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय हा राजकारणाचा मुद्दा नसून सर्वांनी या याविरोधात एकवटे पाहिजे.

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 

तसेच कॉंग्रेस आणि इतर संघटनांना या कायद्याविरोधात साथ देऊ. त्यात शिवसेनेनेही आता यायला पाहिजे असा टोलाही खासदार इम्तियाज यांनी लगावला. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी पाठपुरावा सुरु असुन लोकसभेत मांडलेल्या विषयांना सरकारकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. 

करणार राज्यव्यापी आंदोलन 
एनआरसी आणि कॅब हे एकमेकांशी संबंधी कायदे आहेत. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरही या कायद्याचे पडसाद उटत आहेत. यासाठी धर्म राजकारण पाहू नका. लोक सर्वकाही निमुटपणे सहन करत नाही हे सरकारला कळाले आहे. दमदाटी सहन करणार नाही. केवळ विरोधच नव्हे तर लोकांत त्यांच्यासोबत असल्याचा विश्‍वासही निर्माण व्हायला पाहिजे. त्यासाठी एमआयएम शुक्रवारी (ता. 20) राज्यभरात जिल्हा, तालुका शहर पातळीवर शांतीपूर्ण मार्गाने धरणे, मोर्चा काढून विभागीय आयुक्तांकडे आपला नाकरिकत्व कायद्याचा विरोध निवेदनाद्वारे व्यक्त करेल.

उघडून तर बघा - पंकजा मुंडे करणार औरंगाबादला उपोषण, पण कधी? 

तसेच न्यायालयीन मार्गानेही लढा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातही शुक्रवारी दुपारी दोन वाजता आझाद चौकातून रोशनगेट चंचाचौक मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले; तर जानेवारीत मुंबईत व्यापक मोर्चाची तयारी सुरू असल्याचेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेस शेख अहेमद, डॉ. गफ्फार कादरी, अरुण बोर्डे, गंगाधर ढगे, मौलाना महेफुजउर रहेमान फारुकी यांची उपस्थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIM's Rally against NRC CAB on Friday in Aurangabad : Imtiaz Jaleel