
कुंभार पिंपळगाव (जि.जालना) - गुंज बुद्रूक (ता.घनसावंगी) येथील गोदावरी पात्रात मिनी बंधारा उभारण्याबाबत प्रशासनाकडुन हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या वर्षी गुंज परिसरातील ग्रामस्थांनी पाणी प्रश्नावरून गोदापात्रात उपोषण केले होते व मिनी बंधाऱ्याची मागणी केली होती. त्यानंतर पालकमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भात पाठपुरावा केला.अखेर गुरूवारी (ता.१९) संबंधित अधिकाऱ्यांनी पात्राची पाहणी केली.
बंधारा झाल्यास गुंज, शिरसवाडी,भादली(ता.घनसावंगी), रिदोरी,कवडगाव, गव्हाणथडी, हिवरा, डुब्बा काळेगाव(ता.माजलगाव) या गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे.
शिवणगावचा बंधारा गुंज येथे होणार होता. मात्र या बंधाऱ्याची जागा बदलल्या गेली. पाच किलोमीटरवरती हा बंधारा करण्यात आला. तर लोणीचा बंधारा चार किलोमीटर खाली गेला. यामुळे गुंज,शिरसवाडी,भादली(ता.घनसावंगी)व रिदोरी,कवडगाव, गव्हाणथडी,हिवरा, काळेगाव शिवार, काळुंकामातापर्यंत असे सात किलोमीटरचे पात्र पाण्याअभावी कोरडेच राहिले. गेल्यावर्षी ग्रामस्थांचे पाणी नसल्याने हाल झाले. परिसरातील लोकांनी गोदावरीच्या पात्रात पाणी सोडण्यासाठी उपोषण केले, मात्र पाणी सोडल्या गेले नाही. अखेर थोडे फार पाणी सोडले ते पाणी पात्रातील खड्ड्यामुळे खाली न येता वरतीच मुरले.
हेही वाचा : उन्हाळ्याच्या प्रारंभीच पावसासह गारपीट
डाव्या कालव्यातुन वितरिकाद्वारे सोडलेले पाणी शिरसवाडी, भादली,गुंजपर्यंत पोहचलेच नाही यामुळे या लोकांना पाण्याचा फायदा झाला नाही. मात्र या वर्षी परतीचा पाऊस पडल्याने कालव्यातुन गोदापात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले मात्र हे पाणी तसेच खाली गेले पुन्हा गुंजच्या नशिबी दुष्काळच आला.
या संदर्भात पालकमंत्री राजेश टोपे यांनी पाटबंधारे विभागाकडे वारंवार हा विषय उचलुन धरला. अखेर गुरूवारी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री आव्हाड,लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री निंभोरे,उपअभियंता श्री वांगे,श्रीवास्त,शाखा अभियंता श्री रायबोले यांनी भेट देवुन पात्राची पाहणी केली व सर्वेक्षण केले. गुंज शिवारातील मांजरा खडकाजवळ हा बंधारा होणार आहे. राज्यात कोरोनाचे थैमान असताना त्यातुन वेळ काढुन दुरध्वनीद्वारे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला या संदर्भात सुचना व मार्गदर्शन केले. यावेळी रघुनाथ तौर, रामदास गणेशकर, गजानन तौर,पंडित तौर, प्रभाकर कोरडे, ज्ञानदेव कचरे, बालासाहेब भोसले, बबन नव्हेरकर, अवधुत जाधव, महारूद्र जाधव,गणेश हुंबे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.