
कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे आरोग्याच्या सुरक्षेची जबाबदारी म्हणून लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असले तरी लातूर जिल्हा सध्या ऑरेंज झोनमध्ये आहे. लातूर जिल्हा रेड झोनमध्ये जाण्याची वेळ येऊ नये, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. यासाठी अधिक दक्ष रहायला हवे. लातूरला पुन्हा एकदा ग्रीन झोन मध्ये आणणे शक्य आहे. यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, अशी अपेक्षा पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली.
लातूर : कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे आरोग्याच्या सुरक्षेची जबाबदारी म्हणून लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असले तरी लातूर जिल्हा सध्या ऑरेंज झोनमध्ये आहे. लातूर जिल्हा रेड झोनमध्ये जाण्याची वेळ येऊ नये, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. यासाठी अधिक दक्ष रहायला हवे. लातूरला पुन्हा एकदा ग्रीन झोन मध्ये आणणे शक्य आहे. यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली.
ज्या ठिकाणी रुग्ण वाढत आहेत, योग्य ती काळजी घेतली जात नाही, त्या भागात नक्कीच लॉकडाऊन ४ लागू होईल. हे उघड आहे, असेही ते म्हणाले. 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी फेसबुक लाईव्हद्वारे शनिवारी (ता. ९) नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोनाच्या विरोधात आपला लढा सुरू आहे. तो आणखी किती दिवस सुरू राहणार आहे, हे कोणाला माहिती नाही. दुसरीकडे, लस तयार करण्याचे काम सुरू आहे.
मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
त्यालाही आणखी किती दिवस लागतील? हे कोणाला सांगता येत नाही. त्यामुळे कोरोना पसरू न देणे, त्यासाठी नियमांचे पालन करणे हाच एकमेव उपाय सध्या आपल्या हातात आहे. पालकमंत्री म्हणून मी बारकाईने काम करत आहे. लातुर जिल्ह्यात आणखी कोरोना वाढणार नाही, यासाठी प्रशासनाला वेळोवेळी सूचना देत आहे. नागरिकांकडून येणाऱ्या सूचनासुद्धा स्वीकारल्या जात आहेत.
सध्याची स्थिती लवकरात लवकर संपुष्टात यावी, यासाठीच हे प्रयत्न आहेत. या कामात तुम्ही मला साथ द्या, असे आवाहन देशमुख यांनी केले. उदगीरमध्ये १ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. एकाचे आता २२ रुग्ण झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक पातळ्यांवर खबरदारी घेणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
पालकमंत्री म्हणाले...
- खताचा काळाबाजार होणार नाही, याची दक्षता घेऊ
- विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही. विनाकारण ताण घेऊ नये.
- उजनीचे पाणी लातुरात येईल, हा शब्द कायम आहे
- लपून-छपून, आडमार्गाने कोणाला गावात येऊ देऊ नका, अशी माहिती प्रशासनाला कळवा
- 'कोरोनामुक्त लातूर'साठी नागरिकांचे सहकार्य कौतुकास्पद आहे.
- कोरोनाचा धोका टळला नाही. आणखी जागरूक राहूया.
महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा