
अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी नांदेड-लातूर या महामार्गावरील रस्त्यावरील खड्ड्यांवरुन संतापले आहे. अनेक वेळा अधिकाऱ्यांना विनवणी, आदेश देऊनही कामे होत नाही. लोकप्रतिनिधींच्या मागणीला काही किंमत नाही का, असा सवाल करीत संतप्त झालेले आमदार पाटील यांनी नांदेड येथील प्रकल्प कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी त्यांनी पुन्हा अधिकाऱ्यांना मागणी केली आहे.
अहमदपूर (लातूर) : लातूर ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवावीत म्हणून आमदार बाबासाहेब पाटील यांनी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.
नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील खड्डे तात्काळ बुजवावीत म्हणून शनिवारी (ता.7) नांदेड येथील प्रकल्प संचालक यांच्या कार्यालयासमोर आमदार बाबासाहेब पाटील यांनी कार्यकर्त्यासह धरणे आंदोलन केले. नांदेड-लातूर महामार्गावरून दररोज हजारो वाहनांचे जाणे येणे आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम चालू असल्याने कांही ठिकाणी बाजूचा पट्टा खोदला आहे. सध्याच्या वाहतूक होणा-या या रस्त्यावर एक ते दीड फुट खोल व रुंदीचे ख़ड्डेच पडले आहेत.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
रस्त्याची चाळणी झाली आहे. मागील वर्षभरापासून या रस्त्यावरून गाडी चालवताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. अपघात होऊन खड्ड्यांनी शेकडो लोकांचा बळी घेतला आहे. लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजवावीत म्हणून या आगोदर आमदार बाबासाहेब पाटील यांनी वेळोवेळी तोंडी सूचना, पत्र व्यवहार करूनही संबंधित आधिका-यांनी या कडे दुर्लक्ष केले. हे धरणे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अहमदपूर मतदार संघातील सांगवी ते महाळंग्रा पर्यंतचे खड्डे येत्या दोन दिवसात बुजवून नाही घेतले. तर नांदेड येथील प्रकल्प संचालकाच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला. या आंदोलनात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, जळकोट तालुका अध्यक्ष अर्जुन आगलावे, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे, परिषद सदस्य माधव जाधव, शहराध्यक्ष अजहर बागवान, युवक तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, प्रशांत भोसले, श्याम देवकते, विठ्ठल चव्हाण, वसंत शेटकार, इलियास सय्यद, सतीश नवटक्के, किरण बारमाळे, संग्राम गायकवाड, तानाजी राजे ,व्यंकट वंगे, सचिन जाधव, लिंबाजी गंगापुरे, अनिल बेंबडे ,अमित जाधव, धनराज पाटील, गणेश जाधव, बालाजी तिडोळे, सुदर्शन बेंबडे, जाकीर बागवान, ईस्माईल शेख, आयुब शेख यांची उपस्थिती होती.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(संपादन-प्रताप अवचार)