हिंगोली : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सोमवारी (५ ऑगस्ट) हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते. आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या वतीने आयोजित कावड यात्रेत शिंदे यांनी सलग तिसऱ्या वर्षी सहभाग घेतला. यात्रेनंतर गांधी चौकात झालेल्या सभेत संतोष बांगर यांनी मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली.