मोबाईल चोरीला गेला असेल, तर आधी हे वाचा

file photo
file photo

नांदेड : डिजीटल युगामध्ये वावरत असताना आपण वापरत असलेल्या मोबाईलची सुरक्षा बाळगणे ही काळाची गरज बनली आहे. मोबाईल विषयी बेफिकीर राहणे एखाद्या वेळेस आपल्याला महागात पडु शकते. आजकाल मोबाईल चोरीला जाणे किंवा गहाळ होणे अश्या घटना सर्रास घडत आहेत. मोबाईल चोरीला गेल्यास तात्काळ त्या बाबत पोलिस ठाणे गाठुन त्याविषयी तक्रार नोंद करणे ही युर्झसची क्रमप्राप्त जबाबदारी ठरते. 

मोबाईलमध्ये आपली महत्त्वाची कागदपत्रे, फोटो, क्रेडीट, डेबीट कार्डची माहिती, महत्तवाचे संपर्क, वेगवेगळ्या आॅनलाईन तसेच आर्थिक व्यवहारांची मॅसेज अलर्ट सुविधा, मोबाईलमध्ये असलेल्या सिमसोबत रजिष्टर्ड माहिती जतन केलेली असते. त्यामुळे चोरीस किंवा गहाळ झालेल्या मोबाईलमधुन एखाद्या अॅपच्या माध्यमाद्वारे डेबीट कार्डचा वापर करुन आॅनलाईन व्यव्हार, सायबर स्टाॅकिंग, सायबर बूलिंग, आॅनलाईन डिफेमेनेशन इत्यादी गुन्हे घडु शकतात.

त्याकरिता मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार नोंदविताना मोबाईलचा माॅडेल नंबर, आयएमईआय नंबर, आपला ई- मेल आयडी, मोबाइल नंबर, पत्ता आणि मोबाइल कंपनी, सिमकार्डसंबंधी इतर माहिती नमुद करावी जेणेकरुन ह्या तपशिलाचा आधारे पोलिसांना मोबाईलचा शोध घेणे सोईस्कर होईल.

आयएमईआय नंबर

मोबाईल खरेदी केल्यावर त्याच्या खरेदी बिलवर एक बार कोड सदृश्य १२ अंकी IMEI नंबर दिलेला असतो. तो वापरकर्त्याने सेव्ह करुन ठेवणे फार गरजेचे आहे. कारण मोबाईल चोरीला गेल्यास किंवा गहाळ झाल्यास त्यासंर्दभात पोलिसांकडे तक्रार करताना अर्जामध्ये नमुद करावा लागतो. 

नेटवर्क ऑपरेटरशी त्वरित संपर्क करावा

मोबाईल चोरीला गेल्यास तात्काळ नेटवर्क ऑपरेटरनी दिलेल्या कस्टमर केअर नंबरवर त्वरित संपर्क करुन त्यांना आपण वापरत असलेल्या सिम कार्डचे नंबर त्वरित बंद करावे. त्यामुळे आपल्या सिमद्वारे होणार्‍या आॅनलाईन व्यवहाराला आपण आळा घालु शकतो. व सिमचा गैरवापर थांबवु शकतो. आपल्या सर्व क्रेडिट, डेबिट कार्ड आणि बँकेचे खाते त्या नंबरशी संलग्न असु शकतात, त्यामुळे आर्थिक व्यवहारापासुन आपण त्या चोरास प्रतिबंध घालु शकतो.

पासवर्ड रिसेट

मोबाईल चोरीला जाताच आपण लवकरात लवकर जीमेल, फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअॅपचे पासवर्ड रिसेट करुन घ्यावे, जेणेकरुन डाटा चोरीपासुन वाचु शकतो.

तक्रार नोंद

मोबाईल चोरीची ऑनलाईन तक्रार नोंदविल्यावर ज्या परिसरात मोबाइल गहाळ किंवा चोरी झाला आहे ती हद्द असलेल्या पोलीस ठाण्याला जाऊन मोबाईल संर्दभात एफआयआर (FIR) नोंदवा व त्याची एक प्रत (Receieve copy) घ्या. 

आपल्या बँक किंवा आपल्या क्रेडिट कार्ड कंपनीशी संपर्क साधा

आपले बँकेच्या व्यवहारासंबंधित डेटा, खाते क्रमांकाविषयी माहिती, आपली बँक, क्रेडिट कार्ड असलेल्या कंपनीची माहिती, यात वापरला जाणारा पासवर्ड या संबंधित माहिती बँकेस देऊन त्वरित सर्व व्यवहार थांबवावे नाही तर कोणीही त्याचा गैरवापर करून आॅनलाईन फ्राॅड वगैरे करु शकतो. त्याचबरोबर आपल्या हरविलेल्या मोबाईलमधील सिम कार्ड ब्लाॅक करुन व त्याच क्रमांकाचे सिम कार्ड सुरु करुन घ्यावे.

त्यानंतर तेच सिम कार्ड CEIR वर रजिस्टेशन करिता वापरावे आणि त्या मोबाईलचा  IMEI नंबर CEIR (central Equipment Identity Register) या प्रणालीद्वारे www.ceir.gov.in या वेबसाईटवर जाऊन Block Stolen/Lost mobile या आॅप्शनच्या माध्यमातुन माहिती भरुन submit या बटनावर क्लिक करावे.

त्यानंतर आपणास तक्रार नोंदविल्याचा Request Number मिळेल. Request Number हा मोबाईल मिळाल्यावर त्या मोबाईलचा IMEI Unblock करण्यासाठी उपयोगात आणता येईल. अशा प्रकारे मोबाईल गहाळ झाल्यास त्यातुन होणार्‍या सायबर गुन्हेगारीपासुन आपणास प्रतिबंध घालता येईल, असे लातूरचे पोलिस उपनिरीक्षक आवेज मकसुद अहेमद काझी यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com