

Dharashiv
esakal
धाराशिव: विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी कठोर पावले उचलली आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत जिल्ह्यात विविध कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, नियम मोडणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाईसह मुद्रणालयांचे परवाने रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे आदेश धाराशिवसह लातूर आणि बीड जिल्ह्यांत २५ जून २०२६ पर्यंत लागू राहतील.