सबका साथ, सबका विकासला मोदींकडून प्रतिष्ठा

खासदार प्रीतम मुंडे : केंद्राच्या योजनांतील लाभार्थींचा केला सन्मान
Pritam-Munde
Pritam-Mundesakal

बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या मूलमंत्राला प्रतिष्ठा मिळवून देताना जनसामान्यांच्या उत्थानासाठी अनेक योजना राबवल्या. देशातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले, असे मत खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केले. तर, लोकशाहीत मोदींचे महापर्व ऐतिहासिक ठरल्याचे मत भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केले.

Pritam-Munde
कारण नसताना मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकास उचलले

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे लाभार्थी सन्मान दिवस म्हणून साजरा करताना केंद्राच्या शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत योजना, उज्वला गॅस योजना, शेतकरी सन्मान योजना, मोफत अन्न धान्य योजन, मोफत लसीकरण, पीक विमा योजना, आयुष्यमान भारत योजना, आदी योजनेतील लाभार्थींना सन्मानपत्र व लाडू देऊन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी ॲड.सर्जेराव तांदळे, विजय गोलार, विजय कुमार पालसिंगन, प्रा. देविदास नागरगोजे, उषा मुंडे, भगीरथ बियाणी, सलीम जहांगीर, शंकर देशमुख, विक्रांत हजारे, डॉ. जाधव, शांतीनाथ डोरले, संग्राम बांगर, किरण बांगर, शिवाजी मुंडे, प्रमोद रामदासी, संगीता धसे, सुनील मिसाळ, बालाजी पवार, मधुसुदन खेडकर, पोपट शेंडगे, कृष्णा तिडके, भुषण पवार, अनिल चांदणे आदींची उपस्थिती होती. मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिजामाता उद्यान येथील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्मांना अभिवादन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com