उस्मानाबाद जिल्ह्यात अल्ववयीन मुलीवर सामुहिक अत्याचार; पीडिता कोमात, तिघांविरुध्द गुन्हा दाखल

नीलकंठ कांबळे
Wednesday, 21 October 2020

लोहारा तालुक्यातील एका गावात दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी पीडिताच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून अखेर मंगळवारी (ता.२०) रात्री उशीरा तीन अल्पवयीन मुलांविरूध्द पोक्सा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोहारा (जि.उस्मानाबाद) : लोहारा तालुक्यातील एका गावात दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी पीडिताच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून अखेर मंगळवारी (ता.२०) रात्री उशीरा तीन अल्पवयीन मुलांविरूध्द पोक्सा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सद्यःस्थितीत पीडितेची प्रकृती गंभीर असून ती कोमात असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये एकनाथ खडसे यांचे स्वागत

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १८ आॅक्टोबरला गावातीलच तीन मुलांनी दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केला होता. अत्याचार झाल्याबाबत मुलीने घरी सांगितले नव्हते. दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.१९) मुलीची प्रकृती खालवल्याने तिच्या पालकांनी तिला स्पर्श ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी तिच्या आई, वडिलांनी उलट्या, जुलाब होत असल्याचे सांगितले होते. परंतु डॉक्टरांना अत्याचार झाल्याचा संशय आला. याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर महिला सहायक पोलिस निरीक्षक यांच्यासोबत पीडित मुलीला पुढील उपचार व तपासणीसाठी लातूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धीर सोडू नका, खचून जाऊ नका या शब्दात मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

घटना घडून तीन दिवस झाले होते. परंतु पीडितेचे नातेवाईक फिर्याद देण्यासाठी पुढे आले नसल्याने पोलिसांनी वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली होती. अखेर पीडिताच्या वडिलांनी मंगळवारी रात्री उशीरा लोहारा पोलिस ठाण्यात तक्रार केल्यावरुन तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीवर लातूर येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिला सामूहिक अत्याचाराचा मानसिक धक्का बसला आहे. तिची प्रकृती गंभीर असून ती सध्या कोमात आहे.

 

या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर मुले अल्पवयीन असून १४ ते पंधरा वयोगटातील आहेत. अत्याचार करणारे चौघे जण असल्याचे सांगितले जात आहे. परंतु पीडित मुलगी शुध्दीवर आल्यावरचं नेमका काय प्रकार व किती जणांनी अत्याचार केला ते स्पष्ट होणार आहे. सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच पोलिस प्रशासनाने तपासाला गती दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेचे पोलिस पथक गावात दाखल झाले असून कसून तपास करीत आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Molestation Case Filed Against Three Minor Boys In Lohara Block