शेतकऱयांच्या खात्यावर पैसे होऊ लागले जमा

हरी तुगावकर
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

लातूर : तूर व हरभरा खरेदीचे पैसे शासनाने तातडीने द्यावे या मागणीकरीता गेल्या दोन दिवसापासून स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथील जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले होते. या उपोषणाला मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी भेट दिली. आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. तसेच वरिष्ठांशी संपर्कही साधला. शासन शेतकऱय़ांच्या खात्यावर पैसे जमा करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. येत्या तीन चार दिवसात सर्वच शेतकऱयांच्या
खात्यावर पैसे जमा होतील, अशी ग्वाहीही दिली. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

शेतकऱ्यांची तूर आणि हरभरा शासनाने हमी भावाने खरेदी केला होता.
शासनाकडून लाखो क्विंटलची शासनाने खरेदी करण्यात आली होती. पण या खरेदीचे पैसे चार महिन्यापासून मिळालेले नव्हते. शासनाने हे पैसे तातडीने द्यावेत या करीता स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारपासून जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाच्यासमोर धऱणे आंदोलन सुरु करण्यात आले होते. मंगळवारी देखील दिवसभर हे आंदोलन सुरु राहिले. रात्री मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी या उपोषणाला भेट
दिली. संघटनेच्या पदाधिकाऱयांशी बराच वेळ चर्चा केली.

शासन शेतकऱयांच्या खात्यावर पैसे जमा करीत आहे. जिल्ह्यातील काही शेतकऱयांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. सर्वच शेतकऱयांच्या खात्यावर येत्या चार पाच दिवसात सर्व रक्कम जमा होईल. या करीता त्यांनी संबंधीत खात्याच्या वरिष्ठांशी संपर्क साधून चर्चा केली. आतापर्यंत एक हजार ८७३ शेतकऱयांच्या खात्यावर दहा कोटी ७२ लाख रुपये जमा करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मध्यस्थीने पदाधिकाऱयांनी हे उपोषण मागे घेतले आहे. बुधवारी काही शेतकऱयांच्या खात्यावर पैसे जमा झाले अशी माहिती संघटनेचे विभागीय अध्य़क्ष सत्तार पटेल यांनी दिली.

Web Title: money deposit on farmers account