
कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मोर्तळवाडीतील लोकांनी कोरोनाची तपासणीसाठी आलेल्या कॅम्पला पाठ दाखविली आहे. त्यामुळे प्रशासन नेमके काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उदगीर (लातूर) : मोर्तळवाडी (हाळी) ता. उदगीर येथे शुक्रवारी (ता.४) कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जलद अॅटीजन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र येथील ग्रामस्थांनी या तपासणी शिबिराकडे पाठ फिरवल्याने केवळ आठ जणांची तपासणी करून पथकाला परतावे लागले.
बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन
गेल्या दोन दिवसांपूर्वी या मोर्तळवाडी येथे तपासणी शिबिरात 79 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यात तब्बल 21 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. येथे परत शुक्रवारी या तपासणी शिबिराचे आयोजन करून 230 कुटुंबातील नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले होते.
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव
सरपंच कविता आकनगिरे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर उपासे यांनी गावात दवंडी देऊन लाऊड स्पीकरवर गावात तपासणी करून घेण्याचे आव्हान करण्यात आले होते. तरीही नागरिकांनी प्रतिसाद दिला नसल्याची माहिती ग्रामसेवक श्री उपाशी यांनी दिली आहे.
शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन
दरम्यान नागरिक प्रतिसाद देत नसल्याचे कळतात उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत कापसे यांनी मोर्तळवाडीस भेट देऊन नागरिकांना तपासणी करण्याचे आवाहन केले. तरीही नागरिक तपासणीसाठी पुढे आली नाहीत. हाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ किरण पाटील यांच्या पथकाने केवळ आठ जणांची तपासणी केली या आठही जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
वेगळा मार्ग अवलंबावा लागेल : श्री मेंगशेट्टी
मोर्तळवाडी ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून जास्तीत जास्त तपासण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तपासणी शिबिरास नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही. मी स्वतः गल्लोगल्ली फिरून लोकांना आवाहन केले तरीही लोकांनी पाठ फिरवली. पुन्हा एकदा तपासणी ठेवण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी तपासणी करून घ्यावी अन्यथा तपासणी करण्यासाठी आम्हाला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल असे उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी सांगितले.
(संपादन-प्रताप अवचार)