हिंगोली हिरवेगार करण्याची चळवळ बनली व्यापक 

upkram
upkram

हिंगोली ः हिंगोली येथील रेल्‍वेस्‍थानक भागात झाडे लावून जगवण्यासाठी व स्वतःचा श्वास स्वतःच निर्माण करण्याच्या विचाराने वृक्षप्रेमी मंडळाने वृक्ष लागवडीला सुरूवात केली असून तीन आठवड्यापासून व्हॉटअसप ग्रुपच्या माध्यमातून इतरांना सहभागी होण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे. या उपक्रमात नागरिकांसह शालेय विद्यार्थी सहभागी झाले असून रेल्‍वेस्‍थानक भागात हा उपक्रम सुरू झाला आहे.   

शहरात सकाळच्या वेळी फिरण्यास जाणाच्या वेळेत काही मान्यवर व्यक्ती समोर येऊन या वृक्ष लागवडीला सुरवात केली. वृक्ष लागवडीसाठी स्वतःचे पाऊल उचलणे हे महत्त्वाचे समजून हा उपक्रम रविवारपासून (ता.आठ) सुरू केला आहे. आतापर्यंत तीन रविवार झाले आहेत. सकाळी साडेसहा ते सात या वेळेत वृक्षप्रेमी जमा होऊन साफसफाई करत झाडे लावत आहेत. यात डॉ. किशन लखमावार, खंडेराव सरनाईक, अण्णा जगताप, पंडित अवचार, चंद्रकांत कावरखे, दादाराव शिंदे, डॉ.विकास शिंदे, डॉ.शालिग्राम शिंदे, रतन आडे, बबन सावके, अनिल पोपळाईत, भगवान केंद्रेकर, सोपान चंदाले, सुजित मनवर, श्याम राऊत, रेल्वे विभागाचे श्री. पंकज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले आहेत. 
 
या वृक्षांचा समावेश
येथे लावण्यात आलेल्या वृक्षात बेल, सिताफळ, आंबा, लिंब, करंजी, चिंच, जांभुळ, रामफळ, सिताफळ, वड, पिंपळ, उंबर या सारखी दीर्घकाळ टिकणारी व प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या वृक्षांची लागवड केली आहे. 

वृक्ष संगोपन काळाची गरज बनली 
वृक्ष संगोपन ही काळाची गरज बनली आहे. निरोगी आयुष्य जगायचे असेल तर झाडावर काम करणे गरजेचे आहे. हे ओळखून शहराचा असा भाग तयार व्हावा, जिथे भरपूर वृक्ष असावी आणि थोडासा विसावा घेता यावा, म्हणून वृक्षप्रेमींनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवायला सुरुवात केली 
आहे. हा उपक्रम सुरू झाल्यावर व्हॉटअसप ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांना जोडण्यात आल्याने आता ही चळवळ व्यापक झाली आहे. 

साठ ते सत्तर एकर जमिनीवर वृक्षलागवड
शहर हिरवेगार करण्यासाठी शासनाला, प्रशासनाला मदत करत वृक्षारोपन करुयात, असा संदेश वृक्षप्रेमी मंडळाने ग्रुपच्या माध्यमातून दिला आहे. त्‍याला प्रतिसाद देखील चांगला मिळत आहे. दर रविवारी फिरायच्या वेळी फक्त एक घंटा एकत्र येऊन रेल्वे विभागाच्या बाजूला असलेली साठ ते सत्तर एकर जमिनीवर स्वच्छता व झाडे लावण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. रेल्वे विभागाने या उपक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. सर्वानी या उपक्रमात सहभाग घेत आठवड्याला एक तास झाडासांठी द्यावा, असे आवाहन केल्याने तीन रविवारपासून येथे सकाळच्या वेळी यात्रेचे स्‍वरूप येत आहेत. यात शहरातील विविध शाळा, महाविद्यालय, गुरूकुलातील विद्यार्थी व निसर्गप्रेमी सहभागी होत आहेत. 

हजारो झाडांची लावगड
आतापर्यंत येथे हजारो झाडांची लावगड करण्यात आली आहे. त्‍याला कोटरी सरंक्षण देवून नियमित पाणी देण्याची व्यवस्‍था करण्यात आल्याने शहर हिरवेगार करण्याचा संकल्‍प निसर्गप्रेमी मंडळाने घेतला आहे. 

उपक्रमाला मिळाला चांगला प्रतिसाद
शहर हिरवेगार करण्यासाठी शासनाला, प्रशासनाला मदत करत वृक्षारोपन करुयात असा संदेश वृक्षप्रेमी मंडळातर्फे व्हॉटअसपग्रुपच्या माध्यमातून दिल्याने त्‍याला मोठा प्रतिसाद मिळाला व रेल्‍वे प्रशासनाने जागा देखील उपलब्ध करून दिल्याने ही चळवळ वाढीस लागली. या दर रविवारी एक घंटा झाडासाठी या उपक्रमात शहरातील शाळा, महाविद्यालय, गुरुकुलाचे विद्यार्थी विविध क्षेत्रातील नागरीक सहभागी झाले आहेत. - अण्णा जगताप.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com