esakal | खासदार हेमंत पाटील यांनी हॉटेलचे मालक आणि कामगारांसोबत बसून घेतला खिचडी-भज्यांचा आस्वाद
sakal

बोलून बातमी शोधा

MP Hemant Patil has eaten khichdi and bhaji with the hotel owners and workers.jpg

खासदार हेमंत पाटील दिवाळीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून सर्व सामान्य लोकांना भेटून त्यांच्या घरी फराळ करून दिवाळीचा आनंद द्विगुणित करत आहेत. कसबे धावंडा, येहळेगाव तुकाराम, येलकी, हिंगोली, औंढा नागनाथ, शिरड शहापूर, वाजेगाव अशा अनेक ठिकाणी खासदार हेमंत पाटील भेटी दिल्या.

खासदार हेमंत पाटील यांनी हॉटेलचे मालक आणि कामगारांसोबत बसून घेतला खिचडी-भज्यांचा आस्वाद

sakal_logo
By
राकेश दारव्हेकर

हिंगोली : दिवाळीची खरेदी करणाऱ्यांची आणि येणाऱ्या हॉटेलमध्ये पोटात काहीतरी टाकून जाणाऱ्यांची वर्दळ, हॉटेल मालक आणि नौकर घाई गडबडीत असताना अचानक खासदार हेमंत पाटील यांनी हॉटेल मालक शंकर साहू यांच्या प्रसिद्ध मूग भजे हॉटेलला भेट देऊन मालक आणि कामगारांसोबत बसून हॉटेल मधील खिचडी -भज्यांचा आस्वाद घेत आणि सर्वांना सुखाचा धक्का देऊन अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली.

खासदार हेमंत पाटील दिवाळीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून सर्व सामान्य लोकांना भेटून त्यांच्या घरी फराळ करून दिवाळीचा आनंद द्विगुणित करत आहेत. कसबे धावंडा, येहळेगाव तुकाराम, येलकी, हिंगोली, औंढा नागनाथ, शिरड शहापूर, वाजेगाव अशा अनेक ठिकाणी खासदार हेमंत पाटील भेटी दिल्या.
    
हे ही वाचा : बामणी मंडळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच; सोमवारी कुऱ्हाडी येथे एका शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

याच दरम्यान त्यांनी सोमवारी (ता.१६) हिंगोली मधील प्रसिद्ध मूग भजे हॉटेलला भेट दिली. हॉटेलचे मालक शंकर साहू आणि त्यांचे कामगार ग्राहकांना सेवा देण्यात मग्न असताना व हॉटेलमध्ये ग्राहकांची नाष्टा करण्याची घाई असताना याच घाईगडबडीत खासदार हेमंत पाटील आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेलमध्ये दाखल झाले. मग कोणीतरी म्हणाले, अहो खासदार साहेब आलेत. यावेळी हॉटेल मालक आणि सर्वांची एकच घाई झाली. खासदार पाटील साहेबांना कुठे ठेवू, अन कुठे नको' अशी परिस्थिती लक्षात आल्यावर खासदार हेमंत पाटील यांनीच सर्वांना सुखद धक्का देत आणि कोणताही बडेजाव न करता गरमा-गरम मूग भज्यांची ऑर्डर देऊन सर्वांना सोबत घेऊन सर्वांसोबत खिचडी-भज्यांचा आस्वाद घेतला. 

हे ही वाचा : सोशल मीडियावर शेतकऱ्याने केली जाहिरात; अन थेट शिवारातूनच होतेय सिताफळाची विक्री ! 

खासदार पाटील यांचा हा साधेपणा सर्वांनाच आनंद आणि सुखद धक्का देणारा होता. यावेळी खासदार पाटील म्हणाले की, तुमच्या नावाप्रमाणेच तुमच्या हॉटेलातील खिचडी-भजे खूपच स्वादिष्ट आणि रुचकर आहेत. तुमचा व्यवसाय वाढला तरी स्वाद मात्र तोच आहे आणि पुढेही कायम राहील. हा त्याचा साधेपणा, आपुलकी व प्रेम पाहून ग्राहक सुद्धा आनंदीत झाले. यावेळी हॉटेलचे मालक शंकर साहू म्हणाले की, खासदार हेमंत पाटील यांचे आमच्यावर नेहमीच प्रेम आहे. खासदार येती घरा तोचि आमचा दिवाळी अन दसरा. 

खासदार पाटील यांच्या अचानक भेटीची मात्र हिंगोली शहरात दिवसभर चर्चा होती. यावेळी त्यांच्यासोबत दिलीप बांगर, लखन कुरील, निलेश साहू, अनिकेत साहू, शंकरलाल साहू, सूरज पुरोहित, विक्रम कुरील, पुरन कुरील, शिवम साहू, स्वप्निल भण्डारल्लु, आशु सिंगाड़े, बाबूराव सुकटे, संदीप पुरोहित आदी उपस्थित होते.

संपादन - सुस्मिता वडतिले