खा.राजीव सातव यांनी साधला नागरीकांशी संवाद, हिंगोलीत गाठीभेटीतुन दिवाळी शुभेच्छा

राजेश दारव्हेकर
Monday, 16 November 2020

खा.राजीव सातव यांनी हिंगोली शहरातील प्रमुख मार्गावरून आपल्या पदाधिकार्‍यांसमवेत सर्वसामान्य नागरिक,रिक्षाचालक,चहा विक्रेता,फळ विक्रेते, पान टपरीवाले,आदींसह लघु व्यवसायकांशी गाठीभेटी घेत त्यांच्याशी थेट हितगुज साधत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

हिंगोली : अखिल भारतीय काँग्रेसचे गुजरात राज्य प्रभारी तथा राज्यसभेचे खा. राजीव सातव यांनी शहरातील व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या गाठीभेटी घेत दिवाळीच्या रविवारी (ता. १५)  शुभेच्छा दिल्या.

खा. राजीव सातव यांनी हिंगोली शहरातील प्रमुख मार्गावरून आपल्या पदाधिकार्‍यांसमवेत सर्वसामान्य नागरिक, रिक्षाचालक, चहा विक्रेता, फळ विक्रेते, पान टपरीवाले,आदींसह लघु व्यवसायकांशी गाठीभेटी घेत त्यांच्याशी थेट हितगुज साधत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. व्यापारी व नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याचे नागरिकांशी संवाद साधतांना त्यांनी सांगीतले.

यावेळी त्यांच्या समवेत शहराध्यक्ष बापुराव बांगर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ, हिंगोली तालुका अध्यक्ष शामराव जगताप, विनायकराव देशमुख,शेख नेहाल, केशवराव नाईक, नगरसेवक अनिल नेनवाणी, काँग्रेस प्रवक्ते विलास गोरे, माबुद बागवान, डॉ.  सतिश पाचपुते, ओम देशमुख नगरसेवक आरेफ लाला, नगरसेवक मुजीब कुरेशी तसेच आबेदअली जंहागीरदार, प्रभुअप्पा जिरवणकर, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष जुबेर मामु, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष बंटी नागरे, अजय बांगर, शासन कांबळे, दिपकसिंह गहिरवार, राजदत्त देशमुख आदी उपस्थित होते.

हेही वाचा -  नांदेड : घरातील व्यक्ती आजारी असल्यामुळे दिवाळी साजरी न करू शकणाऱ्या नातेवाईकांना दिवाळीचे चार दिवस मिष्टान्न भोजन

कळमनुरी येथेही खासदार राजीव सातव यांनी घेतल्या व्यापाऱ्यांच्या भेटी

कळमनुरी :  दिवाळीनिमित्त खासदार ॲड. राजीव सातव यांनी रविवार (ता. १५)  शहरातील व्यापारी व नागरिकांच्या सदिच्छा भेटी घेत संवाद साधला.

दिवाळीनिमित्त खासदार ॲड राजीव सातव यांनी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते केशवराव नाईक नगरसेवक ॲड. इलियास नाईक, डॉ. नीलेश सोमानी, अरुण वाढवे, संदीप गाभणे, सुहास गुंजकर, सादिक नाईक, मोहम्मद रफीक, तन्वीर नाईक, मैसन चाऊस ,दत्ता अंभोरे ,संदीप घोटे, शेख सलीम, यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

 यावेळी श्री सातव यांनी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची सदिच्छा भेट घेत त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या प्रत्येक छोट्या- मोठ्या व्यापार्‍यांची भेट घेत त्यांनी दिवाळीनिमित्त  बाजारपेठेतील व्यापार व कोरोना आजारामुळे निर्माण झालेली स्थिती याबाबत संवाद साधला शहरातील मुख्य बाजारपेठ पोलिस स्टेशन रोड या मार्गावरील शहरातील  व्यापारी व नागरिकांची संवाद साधून दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Rajiv Satav interacts with the citizens, wishes a happy Diwali through a meeting in Hingoli