esakal | रेडिओद्वारे स्फोट घडविल्याच्या प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता
sakal

बोलून बातमी शोधा

रेडिओद्वारे स्फोट घडविल्याच्या प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

सत्र न्यायालयाने सुनावली होती जन्मठेप

रेडिओद्वारे स्फोट घडविल्याच्या प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई (बीड) : रेडिओद्वारे स्फोट घडविल्या प्रकरणात आबा ऊर्फ मुंजाबा राजाभाऊ गिरी (रा. केंद्रेवाडी, ता. अंबाजोगाई) यास दोषी ठरवून अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, आरोपीविरोधात कुठलाही सबळ पुरावा नसल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा खटला रद्दबातल ठरवत आबा उर्फ मुंजाबा गिरी याची निर्दोष मुक्तता केली.

हेही वाचा: लातूर-अंबाजोगाई रस्त्यावर बस ट्रॅक्टरला पाठीमागून धडकली, नऊ प्रवाशी जखमी

गिरी यांचे गावातीलच गोपीनाथ तरकसे यांच्यासोबत शेतीवरून भांडण सुरू होते. त्यामुळे आबा गिरीने नांदूरघाट येथील दत्ता जाधव याच्याकडून जिलेटिन कांड्या घेऊन रेडिओ स्फोटचा कट रचला. मात्र, यात रेडिओचे पार्सल बसमध्येच राहिले अन वाहकाने तो रेडिओ घरी नेला. या स्फोटात त्याचे कुटुंब जखमी झाले. पोलिसांनी तपास पूर्ण करून आबा गिरी याच्याविरुद्ध न्यायालयात ११ जानेवारी २०१४ रोजी दोषारोपपत्र सादर केले. अंबाजोगाई येथे अपर सत्र न्यायाधीश आर. ए. गायकवाड यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे चोवीस साक्षीदार तपासण्यात आले. सबळ पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने गिरी यास शिक्षा सुनावली. दत्ता जाधवविरोधात सबळ पुरावा न मिळाल्याने निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

हेही वाचा: केज-अंबाजोगाई महामार्गावर शिवशाही बसच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

संशयाचा मिळाला फायदा

आबा गिरी यानेच रेडीओचे पार्सल बसमध्ये ठेवल्याचा पुरावा नाही, तसेच रेडीओमध्ये सेल टाकल्याबरोबर स्फोट होईल असे सर्किट तयार करण्याएवढा आरोपी तज्ञ नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे संशयाचा फायदा देत न्यायालयाने हा खटला रद्दबातल करून आबा गिरीची मुक्तता केली. या प्रकरणात आरोपीच्यावतीने ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी काम पाहिले.

loading image