जालन्यातील अंबडमध्ये युवकाचा खून

जुन्या भांडणाच्या कारणावरून चाकूने भोकसले

अंबड (जि. जालना) - अंबड तालुक्यातील शिरनेर येथे गुरुवारी (ता. १४) पहाटे साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान एका किराणा दुकानासमोर चाकू छातीत मारून एकाचा खून केल्याची घटना घडल्याने अंबड शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, यातील संशियत अंबड शहरातील म्हाडा कॉलनीतील गणेश बाबुराव खरात याने फिर्यादीच्या मुलास गुरुवारी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान सिगारेट आणण्याच्या निमित्ताने सोबत घेऊन हॉटेलमध्ये झालेल्या भांडणाच्या कारणावरून मनात राग धरून यातील फिर्यादीचा मुलगा सदानंद आबाजी वैद्य (वय 25) वर्षे याला शिरनेर गावातील सोपान दिवटे उर्फ बटर याचे दुकानासमोर छातीत चाकूने मारून खून केल्याची ह्दयद्रावक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, अंबड पोलीस ठाण्याचे प्रमुख नितीन पतंगे, पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. अंबड पोलीस ठाण्यात यातील मयताचा पिता आबाजी भानुदास वैद्य यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण हे करत आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार हर्षवर्धन मोरे यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com